Home मुंबई *राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ स्पर्धेचे आयोजन*

*राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ स्पर्धेचे आयोजन*

13
0

*राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ स्पर्धेचे आयोजन*

मुंबई, दि. १४ जून २०२६ :

लोकसभेतील विरोधी पक्षनेते, जननायक राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ या विशेष सोशल मीडिया रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील युवकांशी निगडित ज्वलंत प्रश्नांवर आपले विचार निर्भीडपणे मांडण्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केले आहे.

या स्पर्धेसाठी बेरोजगारी, पेपरफुटी आणि महागाई हे तीन महत्त्वाचे विषय निश्चित करण्यात आले असून, सहभागी स्पर्धकांनी यापैकी कोणत्याही एका विषयावर आपले मत व्यक्त करणारी रील तयार करायची आहे.

स्पर्धकांनी तयार केलेली रील १७ जून २०२६ पर्यंत आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट करावी. रील पोस्ट करताना @mumbaiiyc या अधिकृत हँडलला टॅग करणे तसेच #ReelSeRealTalk हा हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे. रीलमधील आवाज व चित्रफीत स्पष्ट असावे तसेच कोणतीही आक्षेपार्ह, अश्लील किंवा अपमानास्पद भाषा वापरू नये, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

स्पर्धेतील उत्कृष्ट तीन रील्सना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹११,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹५,००० आणि तृतीय क्रमांकासाठी ₹३,००० इतकी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

देशातील बेरोजगारी, वाढती महागाई आणि पेपरफुटीसारख्या गंभीर प्रश्नांवर युवकांनी आपली भूमिका प्रभावीपणे मांडावी, सामाजिक व लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा तसेच जनतेच्या प्रश्नांना आवाज द्यावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९०८२२९८०४६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई युवक काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here