Home मुंबई *समर्पण… संघर्ष आणि संकल्प हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा...

*समर्पण… संघर्ष आणि संकल्प हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन मुंबईत;झूम मिटींग घेत सुनिल तटकरेंनी राज्यातील आमदार व पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद…*

10
0

मुंबई दि. ५ जून- समर्पण… संघर्ष आणि संकल्प हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात दिनांक १० जून रोजी दुपारी २ वाजता साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

दादांनी पक्ष विस्तारासाठी… पक्षाचा जनाधार चांद्यापासून बांद्यापर्यंत होण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्याच नेतृत्वाखाली २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकावर राहिला. ७३ जागा विधानसभेवर निवडून आल्या. २०२३ मध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांचे बहुजन समाजाचे व्यापक हित साधायचे असेल तर सत्तेत असले पाहिजे हे विचार घेऊन सत्तेत सहभागी (एनडीएमध्ये सहभागी) होण्याचा निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी सामुदायिकरित्या घेतला. त्यामध्ये मी, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आणि विधीमंडळाचे बहुतांश सदस्य एनडीएमध्ये सहभागी झाले असेही सुनिल तटकरे म्हणाले.

लोकसभेत यश मिळाले नाही परंतु विधानसभेत दादांच्या नेतृत्वाखाली ५९ जागा आम्ही लढलो आणि ४१ जागांवर यश मिळवले. आमचा ७२ टक्के स्ट्राईक रेट राहिला आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले. सरकारची गती दिसू लागली पण आमची गती रोखली गेली ती दादांच्या अकाली निधनामुळे… आता चार महिने झाले दादा आपल्यातून जाऊन. कमालीच्या वेदना मनामध्ये आहेत. त्यामुळे १० जूनचा वर्धापन दिन समर्पण (दादांसाठी समर्पण) … संघर्ष… (राजकीय आणि विचारांचा संघर्ष) … आणि उद्याचा संकल्प… घेऊन सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन होणार आहे. यासाठीच आज सर्व विधानसभा सदस्य त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख, व इतर प्रमुख पदाधिकारी यांच्याशी झूम मिटींग करुन संवाद साधल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

 

दिनांक १० जून रोजी दुपारी २ वाजता षण्मुखानंद सभागृहात मोठया संख्येने उद्याचा पक्षाचा विस्तार… संघटन… आणि नवीन ऊर्जा घेऊन कामाला लागावे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here