Home मुंबई *गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पात बाधित होणारी २३४ अनधिकृत बांधकामे निष्कासित*

*गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पात बाधित होणारी २३४ अनधिकृत बांधकामे निष्कासित*

9
0

*बृहन्मुंबई महानगरपालिकेची अमर नगर- खिंडीपाडा येथे कारवाई*

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव – मुलुंड जोडरस्त्याच्या कामात बाधित होणारी २३४ बांधकामे हटविण्याची कारवाई महानगरपालिकेच्या टी विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी दि.५ जून २०२६ केली. अतिक्रमण निर्मूलन कारवाई अंतर्गत अमर नगर, खिंडीपाडा येथील रहिवासी आणि वाणिज्यिक २३४ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत.

गोरेगाव-मुलुंड लिंक रस्त्याची लांबी १२. २० किमी आहे. या जोड रस्त्याचे काम चार टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यात रस्ता, भूमिगत बोगदा, उड्डाणपूल आदी कामाचा समावेश आहे. टी विभागाच्या हद्दीतील अमर नगर, खिंडीपाडा येथील सुमारे ३८४ बांधकामे जोडमार्गाच्या उभारणीला अडथळा ठरणारी होती. या बांधकामांपैकी सुमारे १५० वाणिज्यिक आणि रहिवासी बांधकामांचे गत आठवड्यात निष्‍कासन करण्‍यात आले होते. तर, आज २३४ बांधकामांचे निष्कासन करण्यात आले आहे.

उपायुक्त (परिमंडळ -६)यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक आयुक्त योगिता कोल्हे यांच्या नेतृत्वात ही अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेचे १० अभियंते, महानगरपालिकेचे १०० कर्मचारी, खासगी १५० कामगार – कर्मचारी यांच्या सोबत २ पोकलेन संयंत्र, ४ जेसीबी संयंत्र, १० डंपर आदींच्या सहाय्याने ही सर्व बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली. मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या नेतृत्वाखालील ५० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here