भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग व त्यांचे सोबत आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मंगळवारी (दि. २ जून) लोकभवन, मुंबई येथे स्वागत समारोहाचे आयोजन केले.
यावेळी आयोजित स्नेहभोजनाला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

















