Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *चित्रपट महामंडळ निवडणूक आखाडा नेहमीचाच* यंदा राजकीय मसाला अधिकचा!

*चित्रपट महामंडळ निवडणूक आखाडा नेहमीचाच* यंदा राजकीय मसाला अधिकचा!

25
0

बालरंगभूमी परिषद अध्यक्ष
अभिनेत्री नीलम शिर्के यांची अभा मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीतून माघार

विजय पाटकर यांचे महामंडळाचे सदस्यत्व रद्द
झाले आहे – अभिनेता सुशांत शेलार

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही संस्था मराठी चित्रपट आणि त्यासाठी पडद्यावर आणि पडद्यामागे कार्यरत असणाऱ्या सर्व घटकांच्या हितवृद्धीसाठी मागील साठ वर्षापासून कार्यरत आहे.
मी स्वतः मराठी नाटके, चित्रपट, मालिका या माध्यमातून गेल्या २५ वर्षापासून रंगभूमीची सेवा करीत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालरंग भूमी परिषद या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्र नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील सर्व घटकांच्या हितवृद्धीच्या दृष्टीने मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून या क्षेत्रातील कलाकार – कामगारांसहित इतर सर्व घटकांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेसाठी आपण योगदान द्यावे असा विचार मनात होता.
नुकतीच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारी मंडळाची निवडणुक जाहीर झाली आणि या निवडणूकीच्या प्रक्रियेत प्रमुख भूमिकेत सहभागी असणारे चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि अभिनेते आनंद काळे या दोघांनीही मी या निवडणुकीत उभे राहण्याबद्दल आग्रही विनंती केली. त्यांचा मान राखून सदर निवडणुकीत सहभागी होण्याचे मी ठरवले होते आणि त्या अनुषंगाने लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून मी स्वतः अभिनेत्री या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे.
दरम्यान चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाच्या सदस्य असलेल्या वर्षाताई उसगावकर यावर्षीच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नसल्याचे मला स्वतः मेघराज राजे भोसले यांनीच कळविले होते, तथापि अभिनेत्री प्रवर्गातून वर्षाताईंनी अर्ज दाखल केल्याचे मला माझा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता कळले, मुळात वर्षाताई यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या विरोधात निवडणूक लढवून चित्रपट महामंडळाचा राजकीय आखाडा करण्याचा माझा कोणताही हेतू नाही.
निवडणूक कार्यक्रमातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्यापासून सुरू होत आहे असे असतानाही प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांमधून काही मंडळींनी आरोप प्रत्यारोप आणि इतरांवर चिखल फेक करायला सुरुवात केली आहे, ही बाब मनाला खेद देणारी आणि अत्यंत वेदनादायक आहे.
मी कोणत्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी किंवा सक्रिय सदस्य नाही तर मी केवळ आणि केवळ रंगभूमीवर श्रद्धा ठेवणारी आणि मागील २५ वर्षापासून रंगभूमीची सेवा करणारी एक महिला कलाकार आहे, याचे देखील भान या विषयाचे राजकारण करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते असे मी अतिशय नम्रपणे नमूद करू इच्छिते.सोमवारी सकाळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षाताई उसगावकर यांच्यासहित काही जेष्ठ रंगकर्मींशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे.

वर्षाताईसहित चित्रपट आणि नाट्यसृष्टीत कार्यरत असणाऱ्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांचा सन्मान राखून मी या निवडणुकीत वर्षाताई उसगावकर यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, त्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कार्यालयीन बाब उद्या पूर्ण करण्यात येईल.
राहिला प्रश्न रंगभूमी प्रतीच्या माझ्या योगदानाचा आणि कार्याचा….
मी सध्या नाट्य परिषद, बालरंगभूमी परिषद आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर रंगभूमीची आणि दिव्यांग कलाकारांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहेच, यापुढे माझ्या परीने चित्रपट महामंडळासाठी देखील योगदान देत राहील….
तूर्तास एवढेच…,
माझी उमेदवारी माघारी घेण्यामुळे कुणाची गैरसोय झाली असल्यास मी व्यक्तिशः दिलगिरी व्यक्त करते, आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी मनःपूर्वक आभार!
-नीलम शिर्क

सुशांत शेलार यांची सुषमा अंधारे मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीवर टीका
सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप .

अभा चित्रपट महामंडळ निवडणुकीत मोठे ट्विस्ट आलेय! अभिनेता सुशांत शेलारने शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे.
मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच आरोप-प्रत्यारोपांनी गाजते, पण आता हा तणाव कला आणि चित्रपट क्षेत्रापर्यंत पोहोचला आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीने एक मोठे राजकीय वळण घेतले आहे. या निवडणुकीमुळे राजकारण्यांमधील शाब्दिक युद्ध अधिकच तीव्र झाले आहे. ताज्या घटनेत, अभिनेता सुशांत शेलारने शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आणि विजय पाटकर यांच्यावरही आरोप केले.

ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी राजकीय दबावामुळे आपल्याला निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप केल्यावर हा वाद सुरू झाला. सुषमा अंधारे यांनी या मुद्द्यावरून सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, राजकारण्यांनी कलाकारांसारखे वागले तर हरकत नाही, पण जर त्यांनी कलेच्या हक्कांवर आणि कार्यक्षेत्रावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली तर ते दुर्दैवी आहे.

अभिनेता आणि शिंदे गटाचे नेते सुशांत शेलार यांनी सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावर थेट आणि व टीका केली. अंधारे यांच्या बोलण्याच्या शैलीवर आणि देहबोलीवर निशाणा साधत शेलार म्हणाले, “जर तुम्हाला फक्त मान हलवून स्वतःला अभिनेत्री समजत असाल, तर तुम्ही अभिनेत्री बनून निवडणूक लढवावी.” त्यांनी पुढे असेही म्हटले की, नीलम शिर्क एक प्रख्यात अभिनेत्री असून त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण घटनात्मक अधिकार आहे.
विजय पाटकर यांच्‍या कार्यकाळात “मानाचा मुजरा’ कार्यक्रम आयोजनात मोठा घोटाळा झालेला
जो कार्यक्रम १५ ते १७ लाखात होऊ शकला असता त्यासाठी महामंडळाच्या खजिन्यातून ५७ लाख रुपये खर्च केले गेले.
ऑडिट रिपोर्ट मधे १० लाख ७ हजार रुपयाचा फरक दिसून आला . विजय पाटकर यांचे निदेशक पद पहलेच रद्द केले आहे, म्हणून पाटकर यांच्या द्वारे लावले गेलेले राजकीय दबावान आरोप पूर्णतः तथ्य हीन व खोटे आहेत. आर्थिक अनियमिततेच्या कारणाने पाटकर यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही. पण ते स्वतः अर्ज भरायला का आले नाहीत असा प्रश्न ही उपस्थित केला आहे.
—-

,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here