शिक्षण मंत्र्यांनी सेल्फ फायनान्स म्हणजेच स्वयं अर्थ सहाय्यता शाळा सुरू करण्यास स्थगिती देण्यात यावी.*
*विशेषत:* जर निवेदनात मागणी केले वर्ग (इयत्ता) संबंधीत गाव/शहर येथील सभोवताली zp किंवा शासन अनुदानित संस्थेमार्फत सुरू असतील तर अशा विषयी इतर कोणत्याही सेल्फ फायनान्स म्हणजेच स्वयं अर्थ सहाय्यता शाळा सुरू करण्यास परवाना देण्यात येऊ नये. जेणेकरून यापूर्वी सुरू असलेले वर्गातील विद्यार्थ्यांच्या पट संख्येवर परिणाम होणार नाही. कारण बऱ्याच ठिकाणी असे घडले असल्याने ZP किंवा शासन अनुदानित संस्थेमार्फत सुरू असलेल्या वर्गावर पटसंखेचा तुटवडा निर्माण होऊन वर्ग बंद करण्याची नामुष्की निर्माण झाली आहे.तथापि सेल्फ फायनान्स संस्थांनी शैक्षणिक सुविधांच्या नावावर पालकांची व विद्यार्थ्यांची दिशाभूल करून आर्थिक लूट सुरू केली आहे.
एकदा विद्यार्थी zp अथवा अनुदानित शाळेमधून शैक्षणिक सुविधांच्या अपेक्षेने सेल्फ फायनान्स शाळेत प्रवेश घेतो नंतर बाकीच्या शासन अनुदानित शाळा पटसंख्ये अभावी बंद पडतात. मात्र असे झाल्यावर सेल्फ फायनान्स संस्थां स्वार्थ साध्य झाल्यासारखं मनमानी करून लूट करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
सेल्फ फायनान्स म्हणजेच स्वयं अर्थ सहाय्यता शाळा(इरादापत्र) सुरू करण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावाचे तपासणी निकष कठोर करावे,
१. शासन स्तरावरुन सध्या काही कालावधी करिता नवीन स्वयं:अर्थ सहायता वर्ग (सेल्फ फायनान्स) शिक्षण संस्था मान्यता देण्यात येवू नये
*(शासन अनुदानित शासकीय व खाजगी अनुदानित मराठी मिडीयम / Z.P.चे वर्ग विद्यार्थी पट संख्या कमी होवून बंद पडू नये याकरिता हा निर्णय आवश्यक आहे)*
२. स्वयं:अर्थ सहायता वर्ग (सेल्फ फायनान्स) सुरू करण्यासाठी असलेल्या नियमांची *मंत्रालय/ शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून आर्थिक देवाणघेवाण* करून पायमल्ली केली जात आहे.
3. गल्लो-गल्ली , गावो-गावी, मोठ्या प्रमाणावर स्वयं:अर्थ सहायता वर्ग (सेल्फ फायनान्स) सुरू झाल्याने खाजगी अनुदानित मराठी मिडीयम/ZP चे वर्गांची पट संख्या घटण्याचे प्रमाण वाढले आहे.
4. अनेक गावात पूर्वीपासून खाजगी अनुदानित/ विनाअनुदानित/ZP चे शाळा सुरू असताना देखील शासन तथा शिक्षण अधिकारी यांच्या काढून आर्थिक देवाणघेवाण करून स्वयं:अर्थ सहायता वर्ग (सेल्फ फायनान्स) सुरू करण्याची परवानगी देणे शिक्षणाचा बाजार केल्या सारखे आहे.
5. शिक्षण महर्षी होण्याच्या स्वार्थी उद्देशाने स्वयं:अर्थ सहायता (सेल्फ फायनान्स) शिक्षण संस्था सुरू करून गाव परिसरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून *इंग्रजी व दर्जेदार शिक्षण देण्याच्या नावाखाली भरमसाठ प्रवेश शुल्क/ उपक्रम शुल्क आकारून सामान्य पालकांची आर्थिक पिळवणूक आणि फसवणूक* केली जात आहे.
6. सद्यस्थिती शिक्षण मंत्रालयाकडून ही सर्व लूट आणि विस्कळीत झालेली शिक्षण विभाग व्यवस्था वठणीवर आणणे व तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे.
7. यासारख्या अनेक बाबी असून असून *स्वयं:अर्थ सहायता (सेल्फ फायनान्स) शिक्षण संस्था सुरू करण्याच्या अथवा मान्यता देण्याच्या विषयी सद्यस्थितीत शिक्षणं मंत्री आणि शिक्षण मंत्रालय यांचे कडून काही कालावधी करिता की होईना पण नवीन वर्ग सुरू करण्यास *बंदी तथा मनाई आदेश देण्यात यावा.*
Home मुंबई शिक्षणं विभाग – *सेल्फ फायनान्स म्हणजेच स्वयं अर्थ सहाय्यता शाळा मान्यता(इरादापत्र) प्रस्तावांचा...

















