Home मुंबई *एका भगिनीने वरळीहून निघालेल्या भाजपच्या मोर्चासमोर जाऊन, खोटे नॅरेटिव्ह पसरवणा-या भाजपाचा खरा...

*एका भगिनीने वरळीहून निघालेल्या भाजपच्या मोर्चासमोर जाऊन, खोटे नॅरेटिव्ह पसरवणा-या भाजपाचा खरा चेहरा उघडा पाडला !*

7
0

*काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्वीट*

महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नॅरेटिव्ह पसरवणा-या भाजपाचा खरा चेहरा एका भगिनीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला आहे.

महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा भाजपाचा डाव ‘इंडिया’ आघाडीने आधीच हाणून पाडला होता. त्यानंतर आता मोर्चे आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता; मात्र या धाडसी भगिनीने तोही डाव उधळून लावला आहे.

आज फक्त मंत्री गिरीष महाजन यांना पळवून लावले आहे. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here