Home मुंबई *मुंबई कोकण मजूर सहकारी संघातर्फे शुक्रवारी सहकारी संस्थांचे प्रशिक्षण शिबीर*

*मुंबई कोकण मजूर सहकारी संघातर्फे शुक्रवारी सहकारी संस्थांचे प्रशिक्षण शिबीर*

8
0

*मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते होणार उदघाटन*

मुंबई – मुंबई कोकण विभागीय मजूर सहकारी संघातर्फे शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० ते २.३० या वेळेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या शुभहस्ते सहकारी संस्थांचे प्रशिक्षण शिबीर पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर असतील.

दादर (पूर्व) येथील कोहिनुर मंगल कार्यालय येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजक व मुंबई कोकण विभागीय मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष सुनिल बांबूळकर, उपाध्यक्ष सुहास गमरे, सचिव लक्ष्मण आंगणे, संचालक प्रभू बिरादार, शशीकांत पाध्ये, बाळकृष्ण साळुंखे, अनिल गडकर, दादासाहेब इंगळे, दिनकर मोहिते, श्रीकांत राणे, मोहन शेट्टी, रेणुका कांबळे, स्वाती करांडे, मोहन अंधेरे यांनी दिली.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here