Home मुंबई *महानिर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ पदाची अंतिम यादी २० एप्रिलच्या आत लागणार*:-डॉक्टर नितीन वाघ...

*महानिर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ पदाची अंतिम यादी २० एप्रिलच्या आत लागणार*:-डॉक्टर नितीन वाघ कार्यकारी संचालक (मानव संसाधन)

11
0

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने महानिर्मिती कंपनीत तंत्रज्ञ-३ पदाची अंतिम यादी तात्काळ लावून भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी याबाबत संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे २० एप्रिल २०२६ पासून संबंधित उमेदवारांना घेऊन आंदोलन करणार असण्याची नोटीस दिली होती. त्या नोटीची प्रत प्रत्यक्ष भेटून डॉक्टर नितीन वाघ कार्यकारी संचालक मानव संसाधन यांना देण्यात आली. त्या नोटीसच्या अनुषंगाने महानिर्मिती कंपनीचे प्रकाशगड कार्यालय येथे डॉक्टर नितीन वाघ कार्यकारी संचालक (मानव संसाधन),मा.आनंद कोंत मुख्य महाव्यवस्थापक (मासं) व मा.पुरुषोत्तम वारजूरकर मुख्यऔद्योगिक संबंध अधिकारी यांच्या समवेत दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी कॉम्रेड कृष्णा भोयर (सरचिटणीस) व कॉम्रेड अनिल बिडवाडकर (संयुक्त सचिव) यांनी सविस्तर चर्चा करताना महानिर्मिती कंपनीत तंत्रज्ञ-३ पदाच्या भरती प्रक्रिये मध्ये सहभागी झालेल्या उमेदवारामध्ये अंतिम यादी लावण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे प्रचंड असंतोष आहे हे निदर्शनास आणून देण्यात आले.
महानिर्मिती कंपनीच्या प्रशासनाने चर्चेदरम्यान स्पष्ट करण्यात आले की,आयबीपीएस या कंपनीला अंतिम यादी महानिर्मिती कंपनीकडून फायनल करून देण्यात आली व सोबतच जातीनिहाय आरक्षण व समांतर आरक्षण हे सुद्धा कळविण्यात आलेले आहे. त्यांनी लवकरात लवकर अंतिम निवड यादी महानिर्मिती कंपनीत द्यावी याकरिता यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.आयबीपीएस या कंपनीकडे इतरही काही कंपन्यांची तसेच भारतीय रिझर्व बँक यांची भरती प्रक्रिया सुरू आहे.त्यामुळे महानिर्मिती कंपनीचे अंतिम यादी देण्यास विलंब होत आहे.मात्र आयबीपीएस कंपनीच्या व्यवस्थापनाने २० एप्रिलच्या आत अंतिम यादी महानिर्मिती कंपनीस देण्याबाबत सहमती दर्शविलेले आहे. महानिर्मिती कंपनीच्या व्यवस्थापनास याबाबत लेखी पत्र देऊन तसेच संघटनेस कळवावे असे विनंती करण्यात आली ती त्यांनी मान्य केली असून १५ एप्रिल रोजी तसे पत्र संघटनेस देण्यात येणार आहे. झालेल्या चर्चेचे माहिती संबंधित उमेदवाराकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहे. आझाद मैदान येथे असलेले आंदोलन अजून सभेत करण्यात आलेले नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे.
*आपला विश्वासू*
*कॉम्रेड कृष्णा भोयर*
*सरचिटणीस*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here