Home मुंबई महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर , दलितोध्दारक ईश्वरदूतास शतदा वंदन!

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर , दलितोध्दारक ईश्वरदूतास शतदा वंदन!

16
0

अग्रलेख
शीतल हरीष करदेकर

देवाने जाती निर्माण केल्या न धर्म, ईश्वराने तथा वैश्विक शक्तीने सजीव निर्मिती केली तसाच मानवाचा जन्म झाला. मग या जाती कुठून आल्या?
दुसऱ्यांना कमी कमजोर लेखून वर्चस्व गाजवण्याची मानसिकता कुठून आली? ती आली झुंडीच्या पैशाच्या आणि मीपणाच्या माजातून!
माणसाने माणसाशी माणसासम वागणे…ही साधी माणुसकी माणूसपण हा प्रत्येक धर्म सांगतो.
इथे तर छोट्या मुलांना संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावडांना या माजोरड्यांनी छळलं, संत तुकारामांना वैकुंठी धाडलं….मग गाय गरीबांची
दशा ती काय?
साफसफाई करणारा समाज गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू लावून का फिरवला गेला?
ती माणसं नव्हती का?
कालही एक बातमी आली होती गटर साफ करणारे दोन कर्मचारी विना सुरक्षा किट/साधनं न वापरता सफाई करत होती?
अशा अनेक गोष्टीं आहेत..इथे आपण सुधरत नाही.
आज डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महामानवाचा जन्मदिवस! त्यांनी समाजाला खूप काही दिलं.सुधारणेचा मार्ग दाखवला…म्हणून तर आपण त्यांना महामानव म्हणतो.
ते सर्व जाती पातींचे आहेत तरीही ते आजही ठराविक लोकांपुरते मर्यादित ठेवले जातात ही मोठी शोकांतिकाच! आंबेडकरांचे विचार पुरेसे आजही गरजवंतापर्यत पोहोचलेले नाहीत.
स्त्रियांनाही अधिकार देणारे, घटनातज्ज्ञ क्रांतिसूर्य बाबासाहेब!
पण लक्षात कोण घेतो?
जे मोठे झाले ते उच्च स्तरीय बनले आणि आपली जबाबदारी विसरले.
आज म्हणूनच पुन्हा नव्याने डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे चिंतन होण्याची गरज वाटते.

●भारतीय संविधानचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४एप्रिल १८९१ ला मध्य प्रदेशातील महू या लष्करी छावणीच्या ठिकाणी झाला होता. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ ब्रिटीश काळात सैन्यात सुभेदार होते. त्यांची यंदा १३५ वी जयंती संपुर्ण देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर भव्य ड्रोन शो,सांस्कृतिक कार्यक्रम,रॅली आणि अभिवादन सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ही जयंती समता आणि ज्ञानाचा उत्सव म्हणून साजरी केली जात आहे.या जयंतीनिमित्त बाबासाहेबांचे महत्वाचे विचार विचार वाचून समजुन आपले आयुष्य बदलेल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार लक्षात घेऊन वागण्यात खूप बदल करता येतील.
मग खोट्या नावापुरत्या दिखाऊ नेत्यांची गरज रहाणार नाही…वाचाल तर वाचाल , हा ही त्यातलाच एक अर्थपुर्ण संवाद!
● बाबासाहेब म्हणतात, आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
●“नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा.” आपण जे करतोय किंवा आपल्यात जी ताकद आहे ती ओळखायला शिका. नशिबावर अवलंबून निर्भर राहू नका.

● उगवत्या सुर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरु नका.
●माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडघाभर ज्ञानात जाता येईल.
●जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही.जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.
●जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका, या जगात काहीतरी करुन दाखवायचे आहे. अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा.जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.
● वाणीचा आणि भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.
●मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दवडण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.
●माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे,लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
● शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे. आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
●सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.
● ‘जे इतिहास विसरतात, ते कधीच इतिहास घडवू शकत नाहीत.इतिहास कधी विसारायचा नसतो. त्यातून अनेक गोष्टी शिकायच्या असतात. ज्या चुका इतिहासात झाल्या त्या पुन्हा होऊ द्यायच्या नसतात. त्यावेळीच तुम्ही इतिहास घडवू शकता.
● हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. तुम्हाला तुमचे हक्क मिळवायचे असतील संघर्ष करायला शिका. त्यानंतरच तुम्हाला तुमचे हक्क मिळतील.
● बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे. आपण नेहमी काहीतरी शिकत राहिले पाहिजे. आपले ज्ञान वाढविण्यावर भर दिला पाहिजे.
● अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी आणि स्वावलंबी बनले पाहिजे.

●●डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संदेश आजही प्रेरणादायी आहेत. त्यांचे काही प्रमुख संदेश आहेत:

*शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा*: डॉ. बाबासाहेबांनी जनतेला शिक्षित होण्याचा, एकत्रित होण्याचा आणि संघर्ष करण्याचा संदेश दिला.
*शीलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे*: डॉ. बाबासाहेबांनी शील आणि शिक्षणाचे महत्त्व सांगितले.
*लोकशाही म्हणजे सहजीवनाने राहण्याची एक पद्धत*: डॉ. बाबासाहेबांनी लोकशाहीचे महत्त्व सांगितले.
*एखाद्या समाजातील प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली आहे, हे पाहिले पाहिजे*: डॉ. बाबासाहेबांनी महिलांच्या उत्कर्षाचे महत्त्व सांगितले.
*मी समाजकारण, राजकारणात असलो तरीही मी आजन्म विद्यार्थीच आहे*: डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले.
*धर्म हा माणसाकरिता नसून माणूस हा धर्माकरिता आहे*: डॉ. बाबासाहेबांनी धर्माचे महत्त्व सांगितले.
*मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो*: डॉ. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे महत्त्व सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संदेश आजही प्रेरणादायी आहेत आणि त्यांचे अनुसरण करणे महत्त्वाचे आहे.
पण किती जण लक्षात घेणार हा अभ्यासाचा विषय आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here