राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ११, नवीमुंबई येथील ३७७ रिक्त पदाकरिता २३,३३९ उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले आहेत. सदरची सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया – बुधवार दिनांक १९/०६/२०२४ रोजी पासून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ११, नवीमुंबई येथे सुरु होणार आहे.
पोलिस भरती संदर्भात खालील महत्त्वाचे मुद्दे आहेत.
१) दि.१९/०६/२०२४ रोजी सकाळी ०४.०० वाजेपासून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ११, कॅम्प बाळेगाव, व्हाया मुंब्रा, बालेगाव गणेश मंदिर, पोस्ट वाकळण, ता. कल्याण, जि. ठाणे. पिन – ४००६१२ येथे पश्चिम गेटमधून प्रवेश दिला जाईल. उमेदवारांना सकाळी – १२.०० वा. पर्यन्तच प्रवेश दिला जाईल.
२) पोलिस भरतीला येताना मुंबई मधील पावसाळी हवामान पाहता उमेदवारांनी आपआपल्या स्तरावर दक्षता, काळजी घ्यावी.
३) पोलिस भरतीसाठी येताना १२ वी पासचे सर्टिफिकेट, जातीचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षणमधून ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांनी सदर आरक्षणासंबंधीत आवश्यक प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे.
४) पोलिस भरतीला येताना ओळखपत्र तपासणीसाठी सोबत प्रवेशपत्र व त्याच्या पडताळणीसाठी आधारकार्ड/ पॅनकार्ड/ ड्रायविंग लायसन आणि ४ पासपोर्ट साइज फोटो सोबत घेऊन यावेत.
५) जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवू शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल.
६) काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी करिता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल अश्या उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल.
७) काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल.
८) अधिक माहितीसाठी www.mahapolice.gov.in व policerecruitment2024.mahait.org या संकेत स्थळाला भेट देण्यात यावी.
Sd/-
(श्रीमती मोक्षदा पाटील )
समादेशक,
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ११, नवीमुंबई

















Yes mamm