Home महाराष्ट्र रामदास आठवले , केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री यांनी घेतली उपसभापती डॉ.नीलम...

रामदास आठवले , केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री यांनी घेतली उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट.

227
0

आज दि.१७ जुन रोजी दि.केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांनी मुंबई येथील निवासस्थानी डाॅ नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली.
भेटी दरम्यान आठवले यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मराठवाडा विद्यापीठाचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ करावे या आंदोलनापासून सुरू झालेला ते आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात जीवनातील अनेक चढ-उतार व आपला अनुभव कथन करत मार्गदर्शन केले. तसेच डाॅ गोऱ्हे यांनी रिपब्लिकन पक्षापासून सुरू झालेली राजकीय वाटचाल व बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती व भीम शक्ती कल्पनेचा केलेला उदय कसा झाला,त्यातून शिवसैनिक व भीमसैनिक यांचे निर्माण झालेले एकोप्याचे नाते याचा प्रकर्षाने उल्लेख केला .
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष व महायुती अधिक जोमाने व नव्या उमेदीने काम करेल असा विश्वास व्यक्त केला .
याप्रसंगी रामदास आठवले व डॉ गोऱ्हे यांच्या अनुभवाचा व राजकीय प्रवासाचा निश्चितच उपयोग होईल आणि पदाधिकार्याचा आत्मविश्वास वाढेल असे मत उपस्थित महिला पदाधिकारी यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कला शिंदे,उपनेता शिवसेना व शिल्पा बोडके,विशाखा मोरये,शिल्पा वेले,वैष्णवी घाग,शीतल म्हात्रे बिंद्रा, राजश्री मांदवीलकर हे विभाग प्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here