Home मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेसंदर्भात कोर्टात लढाई लढणार -आदित्य ठाकरे* *उत्तर...

उत्तर पश्चिमच्या जागेसंदर्भात कोर्टात लढाई लढणार -आदित्य ठाकरे* *उत्तर पश्चिममधे आमचा विजय! हा विजय सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून हिरावला

197
0

*अमोल कीर्तिकर आमचे जिंकलेले खासदार*
  शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आ आदित्यजी ठाकरे यांची शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती . उत्तर पश्चिम लोकसभा निकालात झालेल्या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती . यावेळी शिवसेना नेते अनिल परब, अनिल देसाई, भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि उत्तर पश्चिमचे लोकसभा उमेदवार अमोल किर्तीकर उपस्थित होते .
   यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की “एकूणच निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीन यावर देशभरात  चर्चा सुरू आहे . मी आधीही म्हटलं होतं, EC म्हणजे ‘एंटायरली कॉम्प्रोमाइज्ड’ कमिशन झाले आहे . संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली असती तर भाजपच्या २४० काय ४० जागाही आल्या नसत्या . अमोल कीर्तिकर ह्यांची सीट आम्ही जिंकलेली आहे . ह्या प्रकरणी निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे . अन्यथा कायद्याच्या सहाय्याने पाठपुरावा करून आम्ही हा विजय मिळवणारच ! असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला .

*पत्रकार परषदेत अनिल परब यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित केले*

४ जूनला निकाल लागला यामध्ये अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला . मात्र निकाल संशयास्पद लावण्यात आलाय . *निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे डावलण्यात आली ती १९ व्या फेरीनंतर . प्रत्येक फेरीनंतर कोणत्या उमेदवाराला किती मत मिळाली याची आकडेवारी प्रत्त्येक फेरीनंतर दिली जाते . १९ व्या फेरीपर्यत हे सगळं व्यवस्थित सुरु होतं .
पक्षाचे प्रतिनिधी आकडेवारीची टॅली करत असतात. RO नंतर आकडेवारी फायनल करतात . पण इथे RO आणि उमेदवारचा प्रतिनिधी यामध्ये अधिक अंतर ठेवण्यात आलं होतं, त्यांना दूर बसवण्यात आलं होतं .
* मत मोजून झाल्यानंतर फॉर्म १७ c भरून द्यायचा असतो . ज्यामध्ये आपल्याला उमेदवाराला किती मत मिळाली हे द्यावं लागतं . पण इथे अनेकांना फाॅर्म दिले नाहीत ,
* आमच्या टॅलीमध्ये ६५० पेक्षा अधिक मतं मिळाले आहेत .. ६५० मतांचा फरक आमच्या आणि त्यांच्या टॅली मध्ये येतोय
* *निकाल जाहीर करण्याआधी निवडणूक अधिकारी सांगतात की, आम्ही निकाल जाहीर करतोय . मात्र यामध्ये काहीच सांगण्यात आले नाही .
* *आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितलं तर दोन दिवसात देऊ असे सांगितले . नंतर हे फुटेज देण्यास नकार दिला ,कोर्टाच्या आदेशानुसार देऊ शकत नाही, अस ते सांगतात .
* निवडणूक केंद्रात मोबाइल वापरला गेला . त्यावर कोणाचे फोन आले याची सगळी माहिती आमच्याकडे आहे .
* १० दिवसानंतर गुन्हा दाखल झाला, या १० दिवसात मोबाइल बदलले गेले असा आमचा आरोप आहे . गुरव कोण आहे? या अधिकाऱ्याचा मोबाइल वापरला का ?
* सगळ्यांची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे . हा विजय आमचा आहे,
* हा विजय सरकारी यंत्रनेचा वापर करून हिरवला गेलाय .
* RO चा इतिहास तपासा, किती भ्रष्टाचारच्या केसेस मध्ये त्या आहेत ? इलेक्शन कमिशन ने तक्रार घेतली पाहिजे . यावर चौकशी व्हावी .
* दोन दिवसात याचिका आम्ही कोर्टात दाखल करू .आम्ही निकाल जाहीर केला तेंव्हा तक्रार दाखल केली .
* आम्ही पीपल रिप्रेजेंस्टेशन ऍक्ट अंतर्गत सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करणे यावर आम्ही कोर्टात जाणार आहोत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here