Home मुंबई नगरसेवक तेजिंदर सिंग तिवानांचा आपले संपुर्ण वेतन जनसेवेसाठी देण्याचा प्रेरणादायी निर्णय

नगरसेवक तेजिंदर सिंग तिवानांचा आपले संपुर्ण वेतन जनसेवेसाठी देण्याचा प्रेरणादायी निर्णय

24
0

जनहितासाठी मोठा निर्णय:नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचे संपुर्ण वेतन व भत्ते महापौर निधीसाठी समर्पित
जनसेवा आणि जनकल्याणाप्रती आपली अटळ बांधिलकी दर्शवत नगरसेवक, स्थायी व विधी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी एक स्तुत्य आणि प्रेरणादायी पाऊल उचलत आपले संपूर्ण वेतन जनसेवेसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
तिवाना हे नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड ४७ मधून विजयी झाले असून त्यांनी आपल्या पुढील ५ वर्षांच्या कार्यकाळातील संपूर्ण मानधन तसेच विविध समिती बैठकींसाठी मिळणारे सर्व भत्ते महापौर निधीसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर महोदयांना निवेदनही सादर केले आहे.
यावेळी तिवाना म्हणाले, “नगरसेवक म्हणजे जो नगराची सेवा करतो, आणि ही सेवा निस्वार्थ भावनेने व्हायला हवी. जनसेवा ही माझ्यासाठी एक संकल्प आहे. जनप्रतिनिधीचे पहिले कर्तव्य म्हणजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे. याच भावनेतून मी माझ्या संपूर्ण कार्यकाळातील मानधन आणि सर्व भत्ते महापौर निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.”
त्यांनी विश्वास व्यक्त केला की ही रक्कम गरजू मुंबईकरांच्या मदतीसाठी आणि विविध जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयोगी ठरेल.
भारतीय जनता पक्षाने यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये युवा उमेदवारांना प्राधान्य देत नव्या ऊर्जेसह आणि नव्या विचारसरणीसह महानगरपालिकेत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईच्या विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने घेतलेले हे पाऊल महत्त्वाचे ठरत आहे.
तेजिंदर सिंग तिवाना यांची ही पुढाकार केवळ त्यांच्या जनसेवेतील निष्ठेचे प्रतीक नाही, तर इतर जनप्रतिनिधींसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण ठरते.

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here