Home दिल्ली *नवी दिल्लीत महापारेषणच्या डिजिटल स्टॉलला उत्स्फुर्त प्रतिसाद*

*नवी दिल्लीत महापारेषणच्या डिजिटल स्टॉलला उत्स्फुर्त प्रतिसाद*

23
0

*केंद्रीय ऊर्जामंत्री खट्टर, नाईक, राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भेट देऊन केले कौतुक*
नवी दिल्ली येथे आयोजित भारत इलेक्ट्रिसिटी परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) आकर्षक व पर्यावरणपूरक आधुनिक तंत्रज्ञान केंद्रित स्टॉलला अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच महाराष्ट्राच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी स्टॉलला भेट देत महापारेषणच्या कार्याचे कौतुक केले.

नवी दिल्लीतील यशोभूमी, व्दारका येथे भरविण्यात आलेल्या या चार दिवसीय परिषदेत महापारेषणने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्टॉल उभारला होता. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली, संचालक (संचलन) सतीश चव्हाण आणि अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्टॉल साकारण्यात आला.

या स्टॉलमध्ये महापारेषणची प्रगती, ध्येय-उद्दिष्टे, तसेच भविष्यातील २०३० पर्यंतचे नियोजन याबाबत डिजिटल माध्यमातून माहिती सादर करण्यात आली. ड्रोन आणि मोबाईल ऍप तंत्रज्ञानाव्दारे पारेषण वाहिनी पेट्रोलिंग, एमटीएएमसी सबस्टेशन ऑटोमेशन प्रणाली यांसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती अभ्यागतांना देण्यात आली. या स्टॉलला परिषदेत उल्लेखनीय भेटी मिळाल्या असून देश-विदेशातील प्रतिनिधींनी महापारेषणच्या तांत्रिक प्रगतीचे विशेष कौतुक केले.
—-
*विविध मान्यवरांच्या भेटी*
——–
महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी.तेलंगणा साऊथ वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जितेश पाटील, महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण तसेच महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर यांनी स्टॉलला भेट देऊन समाधान व्यक्त केले. तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही स्टॉलला भेट देत महापारेषणच्या नवतंत्रज्ञानाची प्रशंसा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here