Home पुणे *नवजात बाळाच्या उपचाराकरिता आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा, उपसभापती डॉ. गोऱ्हे...

*नवजात बाळाच्या उपचाराकरिता आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा, उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांची यशस्वी मदत*

75
0

*”₹१.२५ लाखांचे बिल ₹१५ हजारांवर”*

पुणे
विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना मदत करण्याच्या उपक्रमांतर्गत एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. पूजा रोहित मुळे यांच्या नवजात बाळाला गंभीर अवस्थेमुळे NICU मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बाळाचे एकूण बिल सुमारे ₹१,२५,००० इतके झाले होते, जे त्यांच्या कुटुंबासाठी परवडणारे नव्हते. या कठीण परिस्थितीत डॉ. रिंकू मोरे-बावसकर (वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर सेल अध्यक्ष, पुणे) यांनी तत्परतेने पुढाकार घेतला.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करत आणि मानवी दृष्टिकोनातून प्रकरण मांडत त्यांनी बिलामध्ये सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत अखेरीस हॉस्पिटल प्रशासनाने मोठी सवलत दिली. ₹१,२५,००० इतके बिल कमी होऊन केवळ ₹१५,००० इतकीच रक्कम कुटुंबाला भरावी लागली.

दरम्यान, सर्वात दिलासादायक बाब म्हणजे नवजात बाळाची प्रकृती सुधारली असून बाळाला यशस्वीरित्या डिस्चार्ज देण्यात आला आहे. या मदतीमुळे मुळे कुटुंबाने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांचे मनापासून आभार मानले आहेत.

रोहित मुळे (नवजात बाळाचे वडील) यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “अत्यंत कठीण प्रसंगी, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांनी आम्हाला मोठा आधार दिला. त्यांच्या मदतीमुळे आमच्या बाळाला नवजीवन मिळाले आणि आम्हाला आर्थिक दिलासा मिळाला.”

ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here