*काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात भाजप सह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश*
चंद्रपूर, दि.२७ –काँग्रेस पक्षाने सन्मान दिला, प्रतिनिधित्व दिले, प्रतिष्ठा दिली मात्र पक्षनिष्ठेची लक्तरे वेशीवर टांगून पळ काढणाऱ्या वारजुरकर बंधूंनी पक्षाचा विश्वासघात केला. तर चिमूर विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला स्थानिक लोकप्रतिनिधीकडून खीळ पूर्णतः बसली असून येत्या काळात चिमुरात नव्या ध्येयाने नव्या दिशेने काँग्रेस पक्ष क्रांती घडवून इतिहास रचना असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते चिमूर येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
आयोजित कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यास काँग्रेस सेवादल प्रदेश सचिव प्रा. राम राऊत, काँग्रेस प्रदेश ओबीसी संघटक धनराज मुंगले, तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय गावंडे, माजी तालुका अध्यक्ष संजय घुटके, जुनैद खाँन, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके, खोजराज मरसकोल्हे ,विजय घरात, विनोद बोरकर, राजू लोणारे, वामनराव सावसाकडे, माधवजी शिंगरे, यांचेसह चिमूर नगर परिषदचे नगरसेवक, भिसी नगर पंचायतीचे नगरसेवक, सर्व काँग्रेस सेल पदाधिकारी, सर्कल प्रमुख मंचावर उपस्थित होते.
यावेळी चिमूर तालुक्यातील भाजप सह विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आयोजित कार्यक्रमास तालुक्यातील काँग्रेस बूथ प्रमुख, ग्राम काँग्रेस अध्यक्ष यांचेसह हजारोंच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात लुटारूंचे सरकार बसले आहे राज्य कर्जबाजारी झाले असताना संपूर्ण राज्यासह देशात महागाई बेरोजगारीने डोके वर काढले आहे. राज्यांच्या मंत्र्यांना कुठलेही निर्णय घेण्याचे अधिकार नसून आर एस एस चे प्रतिनिधी मंत्र्यांच्या अगोदर फाईल तपासतात असा घनाघातही त्यांनी यावेळी सरकार वर केला. काँग्रेस हे एक धर्मनिरपेक्ष विचारधारा असून सर्वसामान्य जनतेला न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी आमचे नेते राहुल गांधी लढा देत आहे. आरक्षणाबाबतही सरकार विरोधी धोरण पाळत असून सर्व बहुजनांच्या हक्कावर गदा आणण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. चिमूर हे माझे हक्काचे घर असून पुन्हा या शिबिरात काँग्रेसच क्रांती घडविणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी प्रशांत डवले यांना चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
तत्पूर्वी भव्य असा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यात माजी जिल्हा परिषद सदस्य विजय घरात , सुहास ठावरी, विलास दडमल, बंडू सावसाकडे, दत्तू नन्नवरे, महादेव दडमल, वैशाली करारे, कुंदन पडवेकर, गुरुदास रोकडे, अंबादास बारेकर, रणजीत सावसाकडे, रघुनाथ धारणे, चिंधुजी वाढई यांचेसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.





















