Home मुंबई *विक्रम गोखलेंची अखेरची कलाकृती ‘बेवारस’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला*

*विक्रम गोखलेंची अखेरची कलाकृती ‘बेवारस’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला*

25
0

*गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘बेवारस’ चं पोस्टर प्रदर्शित!*

मराठी रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते, दिवंगत विक्रम गोखले यांचा अखेरचा आणि अतिशय हृदयस्पर्शी कथा असलेला ‘बेवारस’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

हरिणी प्रॉडक्शन्स निर्मित ‘बेवारस’या चित्रपटाची प्रस्तुती शिव आर्यन फिल्म्सनं केली आहे. हरिणी प्रॉडक्शन्सच्या रिया कुमार, नितीन विचारे यांची निर्मिती आहे . कथा, दिग्दर्शन विजय राणे यांचं तर पटकथा, संवाद लेखन शिरीष लाटकर यांचे आहे. गीते, संगीत दिग्दर्शन विवेक आपटे, यूजीन डिसोझा व महेश कोळी यांचे छायांकन, अमीर हडकर यांचे पार्श्वसंगीत तर यश सुर्वे यांचे संकलन आहे. चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासह तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, निहार गिते, ऋतुजा बागवे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, श्रीजित मराठे, आदित्य देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

डोळे भरून आलेल्या विक्रम गोखले यांनी एका लहान मुलाला मिठी मारल्याचं चित्र पोस्टरवर आहे. पोस्टरप्रमाणेच चित्रपटाची कथा अत्यंत हृदयस्पर्शी आहे. अनाथालय चालवणाऱ्या तत्त्वनिष्ठ आबाजींची भूमिका विक्रम गोखले यांनी साकारली आहे. *एक लहान अनाथ मुलगा आपल्या अधिकारांसाठी आपल्याच आई वडिलांना कोर्टात का खेचतो? त्या लहान मुलाच्या संघर्षाची अनोखी कथा* या चित्रपटात दाखविण्यात आली असून सोबत सामाजिक परिस्थितीचा पदरही या कथानकाला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here