२७ मार्च, जागतिक रंगभूमी दिवसाच्या निमित्ताने आरती आर्ट अकादमी आणि गुरु प्रोडक्शन्स निर्मित,बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीच्या सहकार्याने, अशोक शहाणे लिखित ‘कोंडी’ या दोन अंकी नाटकाचे अभिवाचन बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातील जयवंत दळवी लघु नाट्यगृहात सादर होणार आहे.
या अभिवाचनाच्या निमित्ताने प्रथमच शालेय जीवनातील दोन वर्गमित्र ज्येष्ठ रंगकर्मी अरुण नलावडे आणि प्रदीप कबरे हे अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत एकत्र येणार आहेत.
या दोन ज्येष्ठ कलाकारां बरोबरच संभाजी सावंत, आनंद सामंत, धनंजय जामदार,नेत्रा वेदक मालाडकर, अजित रांजणे, चारूशिला सावंत असे कलाकार या अभिवाचनात सहभाग घेणार आहेत.
सदर कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९९६९१ ६५१०१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन आरती आर्ट अकादमी संस्थेच्या सूत्रधार आरती कबरे यांनी केले आहे.




















