Home मुंबई *कांदिवलीत प्रकल्पग्रस्तांची घरं पाडण्याची कारवाई तात्काळ थांबविण्याच्या सूचना शासनाला द्याव्यात- आ. प्रवीण...

*कांदिवलीत प्रकल्पग्रस्तांची घरं पाडण्याची कारवाई तात्काळ थांबविण्याच्या सूचना शासनाला द्याव्यात- आ. प्रवीण दरेकरांची सभापतींना विनंती*

27
0

*दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जागा देण्याआधीच मनपाने सुरु केलं तोडकाम !*

*शासनाला निवेदन करण्याची सभापती राम शिंदे यांची सूचना!*

मुंबई – कांदिवली पूर्वेतील सिंग इस्टेट येथील प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर सुरु असलेली कारवाई थांबविण्याच्या सूचना सभापतींनी शासनाला द्याव्यात, अशी विनंती भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज सभागृहात केली.

सभागृहात बोलताना आ. दरेकर म्हणाले की, “कांदिवली पूर्व येथे सिंग इस्टेट वसाहत आहे. तेथे रस्ता जात असल्याने प्रकल्पग्रस्तांची घरे पाडली जात आहेत.
*दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. त्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जागा द्यायची असे ठरले. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांची बैठक झाल्यानंतर त्यांना पर्यायी घरे देण्याचे ठरल्यानंतरही घाईगर्दीने तोडकाम सुरु केलेय. ती लोकं पर्यायी जागेवर जाण्यास तयार आहेत. परंतु त्यांना काही कालावधी द्यावा. त्यांची मुले आहेत, त्यांचे शिक्षण आहे. घरे तोडली तर ही कुटुंबे रस्त्यावर येतील.* घरांवर सुरु असलेली तोडक कारवाई तात्काळ थांबवावी अशा सूचना सभापतींनी शासनाला द्याव्यात.” अशी विनंती दरेकरांनी केली. यावर सभापती राम शिंदे यांनी शासनास निवेदन करण्याच्या सूचना दिल्या.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here