Home मुंबई *केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा...

*केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेट* – *डॉ. गोऱ्हे यांच्याकडून सत्कार व शुभेच्छा*

83
0

मुंबई
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शुक्रवारी विधानभवन येथे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे स्वागत करून शाल व पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला.

या प्रसंगी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सव निमित्त प्रकाशित करण्यात आलेले “विधान परिषदेने संमत केलेली महत्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे” हे पुस्तक भेट म्हणून दिले. तसेच, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या आयुष मंत्रालयामार्फत देशभरात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे व कामाचे कौतुक केले.

या सदिच्छा भेटीदरम्यान ज्येष्ठ संपादक योगेश त्रिवेदी आणि किशोर आपटे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here