या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जोसेफ कोळी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यशवंत किल्लेदार या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
अध्यक्ष पद निवडणूक प्रसंगी, अर्ज मागे घेण्याच्या विहित वेळेत जोसेफ कोळी यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे यशवंत किल्लेदार यांची प्रभाग समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले.
जी उत्तर विभाग कार्यालयात ही निवडणूक पार पडली. उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त विनायक विसपुते, महानगरपालिका उप सचिव प्रियांका देसाई आदी यावेळी उपस्थित होते.

















