*सिनेनिर्मातींसाठीच्या योजनांसह, रोजगाराच्या संधीचा प्रचार आणि प्रसार
कंटेंट क्रिएशन झोनला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक २८ फेब्रुवारी : नाशिक येथे भरण्यात आलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे दादासाहेब फाळके चित्रनगरी दालन उभारण्यात आले आहे.या दालनाला तरुणाईचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे.
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली दालन उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रासाठी यांच्यासाठी विविध योजना – उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांची माहिती या दालनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. यामध्ये एक खिडकी योजना, दर्जेदार मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य योजना, राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा, चित्रपताका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांच्यासह विविध उपक्रम आणि योजनांची माहिती देण्यात येत आहे.
तसेच खास तरुण पिढी साठी तयार केलेला कंटेंट क्रिएशन झोन सर्वाधिक लक्षवेधी ठरत आहे.
महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी तरुणांना कंटेंट क्रियेटर होण्याची इच्छा असते, अशा तरुणांसाठी कंटेंट क्रिएटर झोन या ठिकाणी तयार करण्यात आला आहे. याठिकाणी तरुणांना आपला कंटेंट लिहून कॅमेरा समोर सादर करायचा आहे. यामुळे त्यांना चित्रीकरणातले विविध पैलू समजण्यास मदत होत आहे. या झोन ला तरुणांसह ज्येष्ठ नागरिक सुद्धा कंटेंट तयार करत आहेत.
*कृत्रिम बुद्धिमत्तेला घाबरू नका*
उद्याचे माध्यम विश्व हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावरती चालणार आहे तेंव्हा त्याला न घाबरता योग्य प्रशिक्षण घेऊन, तंत्रद्यानाला स्वीकारून नवोदित तरुण सिनेसृष्टीत काम करण्याचा संदेश या दालनात देण्यात आला आहे.
*तरुणांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग.*
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट आणि टेलिव्हिजन (Ftii) यांच्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून अनेक प्रशिक्षणवर्ग चालवण्यात येत आहेत. त्याची अधिक माहिती या दालनात देण्यात आली.
……….
जनसंपर्क विभाग
दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव
वृत्तनिवेदन 30/2026




















