बृहन्मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी संध्या विपुल दोशी (सक्रे) यांची दि. २३ फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ पार पडल्यानंतर सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महानगरपालिका विशेष सभेत सुधार समितीवर २६ महानगरपालिका सदस्यांची नामनिर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. या वैधानिक समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याकरिता सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सुधार समिती अध्यक्षपदासाठी संध्या विपुल दोशी (सक्रे) यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले.
सुधार समितीचे सर्व सदस्य, सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.
***

















