Home मुंबई बृहन्मुंबई महापालिकेतर्फे शिवजयंती उत्सव संपन्न!

बृहन्मुंबई महापालिकेतर्फे शिवजयंती उत्सव संपन्न!

51
0

हिंदवी स्वराज्याची स्वबळावर निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘शिवजयंती उत्सव’ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत व मुंबईच्‍या महापौर रितू राजेश तावडे यांच्या हस्ते गुरुवार दि १९ फेब्रुवारी २०२६ ला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी खा.अनिल देसाई ,आ. सुनिल शिंदे, विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर ,नगरसेविका तृष्णा विश्वासराव, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, राज्यपालाचे सचिव डॉ .प्रशांत नारनवरे , सहसचिव राममूर्ती, उप आयुक्त (परिमंडळ- २) प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (विशेष ) (प्रभारी)विनायक विसपुते, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे कार्याध्यक्ष किसन जाधव, सरचिटणीस संजय शेटये, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे यांची मुख्य उपस्थिती होती.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानालगतच्या
क्रीडा भवन येथे सकाळच्या प्रसन्न वातावरणात छोटेखानी सांस्कृतिक समारंभ झाला. त्यात माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. महापौर रितू राजेश तावडे या अध्यक्षस्थानी होत्‍या. महापौरांच्या हस्ते माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पुष्‍पगुच्‍छ देऊन स्‍वागत करण्यात आले. महापालिकेच्या संगीत व कला अकादमीच्या चमूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गौरवपर मराठी गीते सादर केली. माननीय राज्यपाल श्री.आचार्य देवव्रत यांनी संगीत व कला अकादमीच्या चमूने उत्‍कृष्‍ठ गीते सादर केल्‍याबद्दल एकावन्न हजार रुपयांची भेट जाहीर केली. चहापानानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथेही अभिवादनः भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे आयोजित समारंभास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, सरचिटणीस संजय शेटये हे मान्यवर उपस्थित होते.
शिवजयंती उत्सवानिमित्त सकाळी ७ ते ९ या वेळेत चौघडा व सनई वादनाने वातावरण प्रफुल्लित झाले. त्यानंतर शिव छत्रपती मंडळाच्या सुहासिनींनी शिवरायांची आरती सादर केली.
यानंतर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील बाल शिवाजीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
याप्रसंगी स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे, प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी उपस्थित होते.
*बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी*
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महानगरपालिका सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे,
महानगरपालिका उप सचिव सुशिल महाजन उपस्थित होते .
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here