Home मुंबई महात्मा ज्योतिबा फुले मंडई अनधिकृत/ बांगलादेशींचा ताब्यात! – किरीट सोमैया

महात्मा ज्योतिबा फुले मंडई अनधिकृत/ बांगलादेशींचा ताब्यात! – किरीट सोमैया

52
0

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसर तसेच महात्मा ज्योतिबा फुले मंडई परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांची पाहणी करण्यासाठी आज भाजप नेते किरीट सोमैया यांनी मुंबई महानगरपालिका नगरसेवक रीटा मकवाना, आकाश पुरोहित, माजी नगरसेवक शरद पेटीवाला, जनक संघवी यांच्यासह पाहणी दौरा केला.

यावेळी महापालिकेचे ए, बी, सी विभागाचे अधिकारी तसेच संबंधित मातारामाबाई आंबेडकर (MRA) मार्ग पोलीस स्टेशन तसेच आझाद मैदान पोलीस स्टेशन आणि लोकमान्य टिळक (LT) मार्ग पोलीस स्टेशन चे अधिकारी ही होते.

“पोलीस आयुक्त कार्यालया समोर, अब्दुल रेहमान स्ट्रीट व महात्मा फुले मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले सापडले. कोणाकडेही लायसन्स नाही. फुटपाथवर दुकानं बांधलेले, फुटपाथवर अनधिकृत बाकडे व दुकानं, महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांना हे प्रत्यक्ष दाखवले.

“आज पाहणी दौरा घोषित केल्या असल्यामुळे संपूर्ण परिसरातील अनधिकृत फेरीवाले गायब होते.”

“आज जसे बांग्लादेशी मुस्लिम अनधिकृत फेरीवाले गायब आहे, तसच स्वच्छ वातावरण, रस्ते, पादचारी पथ असावे,” अशी सूचना व अशी विनंती डॉक्टर किरीट सोमैया यांनी उपस्थित महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांना केली.

महात्मा ज्योतिबा फुले मंडईवर बांगलादेशी मुस्लिमांचा कब्जाच पहायला मिळाला. मंडईच्या बाहेर मोठ्या प्रमाणात मोठा मंडप बांधण्यात आला होता, त्यात अनेक बेकायदेशीर दुकानं उभारण्यात आली आहेत. या दुकानांवर बांगलादेशी मुस्लिम, अनधिकृत लोकांचा कब्जा आहे. मंडईच्या इमारतीबाहेर मुख्य रस्त्यावर डझनावर अनधिकृत गाळे उभारण्यात आले असल्याची माहिती यावेळी सोमैयांनी दिली.

मंडईबाहेर जे मंडपात स्थलांतरित/ तात्पुरते गाळे बांधण्यात आले, त्यालाही ५/६ वर्ष झाले. हे गाळेधारक म्हणजे गाळ्यात आता बसलेले व चालवणारे हे बांगलादेशी मुस्लिम आहेत. या मंडईमध्ये जे कामाला कर्मचारी आहेत, त्यातले मोठ्या प्रमाणात हे महाराष्ट्राबाहेरचे आहेत, अनेक बांगलादेशी वाटतात, यांचे पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा झालेले नाही.

पहिले 2 गाळ्यांची पाहणी केल्यावर हे दोन्ही अनधिकृत असल्याबाबत सोमैयांनी सांगितले. रईस… दुकानाचे मालक असे बोर्ड लावले आहेत.

महात्मा फुले मंडईतील गैरकारभाराची ताबडतोब चौकशी करावी व अनधिकृत बांगलादेशींविरुद्ध, बांगलादेशी मुस्लिमांविरुद्ध ताबडतोब कारवाई करावी, अशा सर्व गाळ्यांना सील करावे आणि अनधिकृत गाळे तोडण्याचे आदेश द्यावेत.” अशी मागणी यावेळी किरीट सोमैयांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here