Home Uncategorized *‘जब्राट’ २० फेब्रुवारीला चित्रपटगृहात*

*‘जब्राट’ २० फेब्रुवारीला चित्रपटगृहात*

52
0

आयुष्याच्या प्रवासात अनेक मित्र-मैत्रिणी भेटत राहतात. काही नाती क्षणभंगुर ठरतात, तर काही आयुष्यभराची साथ देतात. पण खरी मैत्री मात्र प्रत्येक वळणावर ठाम उभी राहते. अशाच निखळ आणि अतूट मैत्रीची भावस्पर्शी कहाणी सांगणारा तारा करमणूक निर्मित आणि प्रगती कोळगे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘जब्राट’ २० फेब्रुवारीला येत आहे. ‘जब्राट’ हा चित्रपट आजच्या तरुणाईचं वास्तववादी आणि सशक्त प्रतिबिंब मांडतो. मुक्तपणे जगणारी, पण आयुष्याने उभ्या केलेल्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरी जाणारी तरुणाई या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. संगीतमय, रंगतदार आणि ऊर्जावान मांडणीसह मैत्रीच्या भावविश्वाला स्पर्श करणारी ही कथा प्रेक्षकांना भावनिक पातळीवर जोडून ठेवते.

लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स असा मनोरंजनाचा जबरदस्त मसाला असणाऱ्या ‘जब्राट’ या संगीतमय चित्रपटात आयुष संजीव, अनुष्का सरकटे, वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे, विक्रम आल्हाट, प्रगती कोळगे या तरुण फळीसोबत संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर, गणेश यादव ही ज्येष्ठ कलाकार मंडळीही यात दिसणार आहेत.

‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी, प्रगती कोळगे आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे, तर सहाय्यक असोशीएट चार्लेस गोम्स हे आहेत. नृत्यदिग्दर्शन आशिष पाटीलने केलं असून लोकगीतांनी नटलेल्या या चित्रपटात बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमाप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर, स्वाती शिंदे यांनी पार्श्वगायन केलेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here