देवगिरी, मुंबई
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ बारामतीकर बंधुंनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील अंत्यसंस्कार स्थळ ते मंत्रालय सायकल यात्रा पुर्ण करत, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.
आदरणीय अजितदादांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास आदरपूर्वक आदरांजली अर्पण करण्यासाठी बारामती ते मुंबई अशी ही सायकल यात्रा आयोजित करण्यात आली होती.
या यात्रेमध्ये ५ सायकल स्वार आणि सुरक्षेसाठी २ दुचाकी स्वार सहभागी होते. शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने ही सायकल यात्रा मुंबई येथे पोहोचली. यानिमित्ताने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करत, आदरणीय अजितदादांचा स्वच्छता आणि निसर्ग रक्षणाचा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला गेला.























