Home Uncategorized *गणेश नाईक यांना खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर निवडणूक लढवा*

*गणेश नाईक यांना खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर निवडणूक लढवा*

50
0

– *खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे गणेश नाईक यांना खुले आव्हान*

अंबरनाथ – भाजपाचे गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे ते काहीही टीका करत आहेत. तर गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. नागरिकांनी त्यांना अनेकदा माजी केलं आहे याचे त्यांनी भान ठेवावे. आणि जर एवढीच खुमखुमी असेल तर , पुढील लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा अथवा हवे तिथून आमच्यासमोर येऊन निवडणूक लढवावी.” असे थेट खुले आव्हान देखील यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here