देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीला जिंतूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अकोली पुलावर भीषण अपघात झाला.
मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास झालेल्या या अपघातात गंगाखेड येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अपघात रोहन संजय राठोड (वय २५, रा. गंगाखेड), कृष्णा बालाजी गुट्टे (वय २५, रा. गंगाखेड),बालाजी आश्रोबा आवटे (वय २७, रा. गंगाखेड),बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे (वय २७, रा. गंगाखेड) आदींचा मृत्यू झाला. या अपघातात गोपाळ गणेश रोकडे (वय २५, रा. गंगाखेड) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.




















