Home Uncategorized “मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात…”, मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन*

“मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात…”, मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन*

51
0

मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवार ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले. जवळपास ३-४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर हे कार्यालय पुन्हा एकदा राजकीय हालचालींसाठी खुले झाले आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम आणि गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला.

उद्घाटन कार्यक्रमात भाजपचा ‘मराठी बाणा’ दिसून आला. उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवकांनी पारंपारिक मराठी पेहराव केला होता. कार्यालयात सत्यनारायणाची पुजा आणि विधिवत पूजन करून नवीन सत्ताकाळाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या आगामी काळातील वाटचालीचा हा नवा अध्याय मानला जात आहे. ही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.

या प्रसंगी कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती आणि त्यावर ‘मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात’ असा संदेश देण्यात आला होता. कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी महानगरपालिका निवडणूकीत निवडून आलेले सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर भाजपाने पक्ष कार्यालय ताब्यात घेतले असून, येत्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती या कार्यालयातूनच आखण्यास सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here