Home Uncategorized *काळाघोडा कला महोत्सवात दादासाहेब फाळके चित्रनगरीने ‘तिच्या जीवनाच्या चौकटी’ हे संकल्पनात्मक शिल्प...

*काळाघोडा कला महोत्सवात दादासाहेब फाळके चित्रनगरीने ‘तिच्या जीवनाच्या चौकटी’ हे संकल्पनात्मक शिल्प साकारले*

55
0

*महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी दिली भेट*

दादासाहेब फाळके चित्रनगरी ३ सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून यंदाच्या काळाघोडा कला महोत्सवात ‘तिच्या जीवनाच्या चौकटी’ हे संकल्पनात्मक शिल्प साकारण्यात आले आहे.
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पेतून ही कलाकृती साकारण्यात आली आहे. मंगळवारी स्वाती म्हसे पाटील यांनी कलाकृतीला भेट देऊन आनंद व्यक्त केला.

दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये पडद्यामागे राहून सिनेमाला आकार देणाऱ्या असंख्य महिलांच्या मेहनतीला ही कलाकृती सलाम करते. प्रत्येक स्त्रीची स्वतःची कथा, संघर्ष आणि स्वप्नं असतात. जशा अनेक चौकटी मिळून एक चित्रपट घडतो, तसंच विविध अनुभवांनी जीवनाला अर्थ मिळतो. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शासनाने वेळोवेळी विविध योजनांतून स्त्रीशक्तीचा सन्मान केला असल्याचे म्हसे पाटील म्हणाल्या.

यावेळी मुख्यलेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे उपस्थित होत्या. हे
शिल्प डॉ. सुमित पाटील यांनी साकारले आहे.

महोत्सवाच्या निमित्ताने विविध योजना आणि उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here