Home मुंबई *खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महालक्ष्मी मंदिरात विशेष आशिर्वचन! डॉ. नीलम गोऱ्हे...

*खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महालक्ष्मी मंदिरात विशेष आशिर्वचन! डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय आयोजन*

66
0

मुंबई, दि. २ फेब्रुवारी २०२६ :
खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी असून, या निमित्ताने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात विशेष आशिर्वचन प्रार्थना व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भक्तीमय कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य तसेच जनसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभावी, यासाठी देवी महालक्ष्मीच्या चरणी विशेष प्रार्थना करण्यात येणार आहे. त्यानंतर देवीला विशेष महाप्रसाद अर्पण करून उपस्थित भाविक व शिवसैनिकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here