*महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मालेगावामधील बेकायदेशीर भरतीबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर संशय!*
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील शिक्षण घोटाळ्याची व्याप्ती थांबता थांबेना..! जवळपास १००० कोटींचा असणारा हा मालेगावातील घोटाळा प्रकरणी आतापर्यंत या चार गुन्हे दाखल होते आणि बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा शिक्षण घोटाळा प्रकरणी मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, सचिव जिभाऊ अहिरे, लिपिक निलेश वडगे, तत्कालीन मुख्याध्यापिका लीलाबाई जगताप आणि शिक्षिका सुवर्णा दिलीप अहिरे यांच्यावर बेकायदेशीर नेमणूक दाखवणे, फरक बिल काढणे या कारणावरून गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की,
सुवर्णा दिलीप अहिरे संशयित आरोपी शिक्षिका यांच्यावर बनावट टीएटी प्रमाणपत्र सादर करण्याबाबत पुण्याला गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर पुणे शिक्षण बोर्डाकडून टीईटी परीक्षा बाबत अजीवन प्रतिबंध लागलेला आहे शासन जी आर २३ जून २०१७ नुसार पवित्र पोर्टल लागू आहे .त्यांची नेमणूक महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा येथे २०१८ मध्ये करण्यात आली व तात्कालीन शिक्षण अधिकारी यांनी पवित्र पोर्टल मुळे २०१९ मध्ये त्याची मान्यता रद्द करण्यात आली. या शिक्षण संस्थेचे चेअरमन व सेक्रेटरी व मुख्याध्यापक व लिपिक यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये तात्कालीन शिक्षण अधिकारी यांच्याशी हात मिळवणी करून आठ दिवसात नेमणूक मान्यता व वेतनश्रेणी मान्यता बेकायदेशीर मिळून घेतले आणि २०१४पासून कार्यरत आहे असे दाखवून २०२६ पर्यंत बेकायदेशीर फरक बिल व वेतन काढून शासनाची ७५ लाखाची फसवणूक केलेली आहे यामुळे या सर्वांवर छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथे दि. २१/०१/२०२६रोजी गुन्हा क्रमांक २१/२०२६ दाखल झालेला आहे
सोबत
चौकट
‘कीर्ती शंकरराव पाथरे या मुख्य दलालावर कारवाई का नाही?’ महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मालेगावामधील बेकायदेशीर भरतीबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर संशय!
मालेगाव- मालेगावातील शिक्षण क्षेत्रात झालेल्या बोगस भरती प्रकरणात मुख्य दलाल कीर्ती शंकरराव पाथरे याच्यावर अद्याप कारवाई न झाल्याने आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण यांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मालेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था, संगमेश्वर, मालेगाव जि. नाशिक (रजि. क्र. इ-८६) या संस्थेत बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आल्याप्रकरणी छावणी पोलीस स्टेशन, मालेगाव येथे गुन्हा रजि. क्रमांक ९८/२५ व ३३६/२५ दाखल आहे. सदर गुन्ह्याच्या चौकशीत सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नाशिक यांनी लेखी माहिती व कबुली जबाब दिलेला आहे.
या कबुली जबाबावरून मुख्य दलाल कीर्ती शंकरराव पाथरे व रोहन अशोक अहिरे यांनी बनावट कागदपत्रे तयार करून उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्याकडे सादर करत बेकायदेशीररीत्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता मिळवून दिल्याचे स्पष्ट होत आहे. इतके ठोस व प्रबळ पुरावे असतानाही आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण यांनी अद्याप मुख्य दलालावर आरोपी म्हणून कारवाई न केल्याने तपास प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे.
याच शिक्षण संस्थेचा कर्मचारी असलेले मुख्य दलाल कीर्ती शंकरराव पाथरे याने उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्यामार्फत आजपर्यंत अनेक बोगस कामे केली असून, त्यातून शासनाचे मोठ्या प्रमाणात अनुदान लुटले गेले आहे. त्यामुळे या दलालानी आजवर केलेल्या सर्व बोगस कामांची सखोल चौकशी करावी तसेच त्याने जमवलेल्या संपत्तीची आर्थिक तपासणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची पोलीस अधीक्षक, अर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण यांनी गंभीर दखल घेऊन मुख्य दलालावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांंसह सर्वत्र होतअसून, ही कारवाई झाल्यास शिक्षण क्षेत्रातील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


















