*लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूका!* *कारण याच माध्यमातून लोकांना आपला मतांचा सहभाग नोंदवता येतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून देतात येते.*
*हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपले प्रतिनिधी असतात, याचे भान अनेकजण विसरतात, मतांचा जोगवा मागणारे बादशाही थाटात वावरतात.*
*आपण ज्यांच्या मतांवर निवडून आलोय त्यांना नेमाने दिवस ठरवून भेटण्यासही टाळाटाळ करतात; फक्त राजकारण आणि पक्ष नि आपल्या फायद्यासाठी राबतात, कधी कार्यकर्त्यांना खुश करतात, तर कधी सणासुदीला आपल्या सोयीने मदतीचे देखावे करतात!*
● *लोकप्रतिनिधी म्हणजे ८०% समाजकारण आणि २०% राजकारण हे ते विसरतात!*
*असो तर राजकारण हे जनहितार्थ माध्यम आहे हे कुणी विसरतील तर जनता त्यांना जागा दाखवतेच.*
*निवडून येण्यासाठी तर फार पुर्वीपासून होत असलेल्या कसरती आपण सिनेमातूनही पाहिल्यात , पण अलिकडच्या काळात थेट पक्ष पळवणे , माणसं फोडणे असे प्रकार होताना दिसले.*
*जिंकण्यासाठी काय पण अशा स्थितीत राजकारण उतरलय.*
*मतदार यादी अचुक असेल, मतदान करण्यासाठीची यंत्रणा उत्तम असेल तर निवडणूक चांगली होऊ शकते.*
*पण यातही बर्याच कसरती होताना दिसून आल्या.*
*कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत की? उद्यापासून पाडू, इव्हीएम, पुसणारी शाई अशा विषयावर बोलायला लागतील…*
हे खरं आहे की, जो विषय *निवडणूक चांगल्या होण्यासाठी आवश्यक व अपेक्षित असतात , त्याची अपेक्षा आपल्या सरकारकडून आणि आचारसंहितेत निवडणूक आयोगाकडून करायच्या नाहीत तर कोणाकडून करायच्या?*
*या निवडणुकीत मतदान यंत्रात अनेक घोळ झाले.*
*लोकं बोलत होते..आणि त्यातच विषय समोर आला तो , पुसल्या जाणाऱ्या शाई चा!*
*निवडणुकीची जबाबदारी असणारे वाघमारे म्हणाले की, “शाई पुसून कुणी दुबार मतदान करेल त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल.”*
तर देवा भाऊ म्हणाले, ऑईलपेंट लावायला हवे.*
*अरे, काय ‘मतदार राजा’ ची चेष्टा करता काय?*
*थेट ‘फुसकट शाई’पर्यंत विषय कशासाठी आणला गेला?*
हा विषय गंभीर आहे. *महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये झालेला हा शाई घोटाळा आहे असे म्हणत, व्यंगचित्रकार प्रशांत आष्टिकर यांची पोलिसात तक्रार दाखल केलीय.*
*निवडणुक आयोगाने कोरस इंडिया कंपनीचे १० रूपयांचे मार्कर वापरून दुबार मतदानाला मदत केली आहे.असे अष्टिकर म्हणतात.*
*यापुर्वी ‘परमनंट वॉटर फ्रुप रोटरी इंक’ जी जर्मनीत तयार होते ती वापरली जात होती.* (*तीची आता २३ एम.एलची किंमत ५०० रू ते ५५०रू आहे. ती फक्त जर्मनीत तयार होते.*)
*या गुन्ह्याबाबत आम्ही महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक दाते यांच्याकडे*
*लेखी तक्रार मी केली आहे . अशी माहिती प्रख्यात व्यंगचित्रकार प्रशांत अष्टिकर* *यांनी आपल्या फेसबुक या समाजमाध्यमावर दिली आहे.*
*याबाबत विचारले असता प्रशांत अष्टिकर म्हणाले की ” कालपर्यंत* *निवडणुकीसाठी कायम वाॅटरप्रुफ असणारी रोटरी इंक वापरली जात होती, जी पर्मनंट वाॅटरप्रुफ आहे. मग यावेळेस मतदानासाठी १०/५₹ चे साधे मार्कर पेन का वापरण्यात आले? ज्याची शाई पुसली जाते.*
● हे दुबार मतदानास सहकार्य करण्यासाठी नियोजनबध्द केलेले षडयंत्र आहे.
*एक जबाबदार नागरीक म्हणून मी पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार केली आहे.*
*यात तक्रारीत या शाई व मार्कर पेनची खरेदी करणाऱ्या राज्य निवडणूक आयोग, राज्य सरकारवर आणि या *लोकशाहीच्या उत्सवाची व जनतेची फसवणूक करणाऱ्या भयंकर रॅकेटवाल्यांवर कारवाई करण्याची आणि ही निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे.*
*आता या शाई व षडयंत्राविरोधात राज्यभरात जिल्ह्या जिल्ह्यात तक्रारी होतील.”*
*असेही ज्येष्ठ *पत्रकार,व्यंगचित्रकार प्रशांत अष्टेकर यांनी स्पष्ट केले .*
*खरच आहे पैसे लोकांचे, मते लोकाची मग या निवडणुकीत ही अशी *लो बजेट शाई का वापरली?*
*असा प्रश्न विचारणे गुन्हा नाही की आपले कुणाशीही वैयक्तिक वैर नाही !*
*राजकीय पक्ष हा विषय लावून धरतील!*
*निवडून येणारे सरकार आमच्यासाठी कोणत्या पक्षाचे नसते ते आमच्या कामासाठी असलेले विश्वस्त असते आणि त्याचसाठी ही अशी शाई का वापरली गेली ही विचारणा करणे ही प्रामाणिक नागरिकांची जबाबदारी आहे.*
*किमान आपले प्रतिनिधी हे आपल्यासाठी जबाबदारी पुर्ण करणारे असावेत, लबाड नसावेत हीच आई भवानी चरणी प्रार्थना!*
***


















