Home Uncategorized नागपुरात काँग्रेस उमेदवाराचे कार्यालय जाळले! भाजपकडे संशयाचं बोट,आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापले!

नागपुरात काँग्रेस उमेदवाराचे कार्यालय जाळले! भाजपकडे संशयाचं बोट,आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापले!

53
0

राज्यातल्या २९ महानगरपालिकांसाठी मतदानाची रणधुमाळी पार पडते आहे. सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान नागरिकांना मतदान करता येणार आहे. दरम्यान नागपुरातून धक्कादायक बातमी समोर आली . शहरातील प्रभाग ३१ मधील काँग्रेसच्या कार्यालयाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत प्रभाग ३१ मधील काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांच्या कार्यालयाबाहेरील पेंडोल, पडदे आणि पक्षाचे झेंडे जळाले आहेत.

मात्र, हे कार्यालय जाळले कि जळले असा संशय काँग्रेसकडून उपस्थित करण्यात येतोय. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांवर आरोप करत कार्यालय बाहेरील पेंडॉल, पडदे आणि पक्षाचे झेंडे जाळण्यात आल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी.
प्रभाग ११ मध्ये काल रात्री भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांना ज्या पद्धतीने शंभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली की अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अशी मारहाण करणे हिंसा करणे काँग्रेसची संस्कृती आहे. असा पलटवार भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here