Home Uncategorized *‘दृश्यम डे’ला होणार ‘दृश्यम ३’ची रिलीज, २ ऑक्टोबर २०२६रोजी सिनेमागृहांत उडणार खळबळ!*

*‘दृश्यम डे’ला होणार ‘दृश्यम ३’ची रिलीज, २ ऑक्टोबर २०२६रोजी सिनेमागृहांत उडणार खळबळ!*

87
0

*बॉलिवूडमधील सर्वात आयकॉनिक थ्रिलर फ्रँचायझी ‘दृश्यम’ पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे.*

 

अजय देवगण अभिनीत ‘दृश्यम ३’बाबत निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी जगभरातील सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता २ऑक्टोबर केवळ गांधी जयंतीच नाही, तर ‘दृश्यम डे’ म्हणूनही ओळखला जाणार आहे.

‘दृश्यम’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर भारतीय सिनेमाच्या पॉप कल्चरची ओळख बनला आहे. या फ्रँचायझीने बॉक्स ऑफिसवर विक्रम प्रस्थापित केलेच, शिवाय ‘फॅमिली थ्रिलर’ या नव्या जॉनरची सुरुवातही केली.

*विजय सालगांवकर : एक पिता, एक योद्धा*
चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा विजय सालगांवकर आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. एक साधा माणूस, जो आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी व्यवस्था, कायदे आणि परिस्थितीशी दोन हात करतो—तेही कोणतीही हिंसा न करता, केवळ बुद्धी, संयम आणि कुटुंबावरील अतूट प्रेमाच्या जोरावर.
दरवर्षी २ ऑक्टोबरला सोशल मीडियावर चित्रपटातील प्रसिद्ध दृश्यांवर मीम्स आणि चर्चांचा पूर येतो. मात्र २०२६ मध्ये हीच तारीख आणखी खास ठरणार आहे, कारण अजय देवगण पुन्हा एकदा विजय सालगांवकरच्या भूमिकेत परतणार आहेत.

*शूटिंग जोरात सुरू, कॅनव्हास अधिक भव्य!*
‘दृश्यम ३’चे शूटिंग सध्या जोरात सुरू आहे. विविध शहरांमध्ये आणि लोकेशन्सवर चित्रीकरण केले जात आहे. यावेळी कथा अधिक तीव्र, मोठ्या स्केलवर आणि अधिक खोलवर मांडली जाणार आहे.
संपुर्ण स्टारकास्टची पुनरागमन या चित्रपटात पुन्हा एकदा अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर यांच्यासह ओरिजिनल स्टारकास्ट दिसणार आहे. यावेळी सालगांवकर कुटुंबाच्या आयुष्यात येणारा वळण पूर्णपणे नवे आणि अनपेक्षित असेल, असा मेकर्सचा दावा आहे.

*यावेळीही सिस्टमला मात देणार का साळगांवकर?*
सर्वात मोठा प्रश्न हाच आहे—साधा दिसणारा सालगांवकर यावेळीही सिस्टमला चकवा देऊ शकेल का? की यावेळी आयुष्य त्याच्यासमोर असा वळण घेईल, ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नसेल?

या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील २ ऑक्टोबर २०२६रोजी, म्हणजेच ‘दृश्यम डे’ला.

चित्रपटासंदर्भातील महत्त्वाची माहिती अशी की ‘दृश्यम 3’ सादर करत आहे Star Studios आणि हा Panorama Studiosचा प्रोडक्शन आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करत आहेत. कथा आणि पटकथा अभिषेक पाठक, आमिल कियान खान आणि परवेज शेख यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे निर्माते आलोक जैन, अजीत अंधारे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक आहेत. मेकर्सचा दावा आहे की ‘दृश्यम 3’ फॅमिली थ्रिलर जॉनरला नव्या बेंचमार्कवर घेऊन जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here