Home Uncategorized *व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया!* *भव्य पोस्टर प्रदर्शित*

*व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया!* *भव्य पोस्टर प्रदर्शित*

81
0

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक, निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित ‘व्ही. शांताराम’ या भव्य चित्रपटाचे १ले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर ‘जयश्री’ या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची पहिली झलक सादर करण्यात आली आहे. ही भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारत असून, व्ही. शांताराम यांची सहकलाकार ते सहचारिणी असा नाजूक आणि भावस्पर्शी प्रवास या व्यक्तिरेखेतून उलगडणार आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तमन्ना भाटिया गुलाबी साडीत मोहक अंदाजात दिसत आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील सोज्वळता, नजाकत आणि कलात्मकतेची नाजुकता पोस्टरमधून प्रकर्षाने जाणवते. या झलकीतून चित्रपटाचा भव्य स्केल, वैभवशाली मांडणी आणि त्या काळाचा समृद्ध कॅन्व्हास स्पष्टपणे दिसून येतो.
निर्मात्यांच्या मते, “जयश्री ही व्यक्तिरेखा भावनांनी आणि कलात्मकतेने ओतप्रोत भरलेली आहे. तमन्ना भाटियाच्या व्यक्तिमत्त्वातील सौंदर्यपुर्ण शालीनता, नैसर्गिक चमक आणि तिच्या डोळ्यांतील भावना या भूमिकेला जिवंत करतात. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री असून, या भूमिकेत ती जणू त्या काळातून थेट आजच्या पडद्यावर आली आहे असे वाटते.”
हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित असून राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे हे निर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here