Home Uncategorized इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

87
0

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय (Directorate of Other Backward Bahujan Welfare) यांच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज, संचालक सोनाली मुळे सह संचालक प्रशांत शिर्के आदी उपस्थित होते.

ओबीसी (OBC), व्हीजेएनटी (VJNT) आणि एसबीसी (SBC) प्रवर्गांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये शिष्यवृत्ती योजना, वसतिगृह योजना, आश्रमशाळा योजना, तांडा-वस्ती योजना तसेच घरकुल योजना यांचा समावेश आहे.

लाभार्थ्यांना अधिक समजेल अशा पद्धतीने विविध योजनांवरील पॉडकास्ट देखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच राज्यातील सर्व वसतिगृहे, आश्रमशाळा आणि क्षेत्रीय कार्यालयांचे (Field Offices) जिओ-टॅगिंग करण्यात आले असून ती माहिती संकेतस्थळावर पाहता येईल.

याशिवाय, संकेतस्थळावर स्वतंत्र तक्रार (Grievance) व निवारण (Redressal) सुविधा उपलब्ध आहे. तसेच नागरिकांच्या मदतीसाठी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये इंटरॅक्टिव्ह चॅटबॉट सुविधा देण्यात आली आहे.
—-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here