शारीरिक दिव्यांग क्रिकेटपटूंना पाठबळ देण्याबाबत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी ‘ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड’ या संघटनेचे पदाधिकारी भेटले.या भेटीप्रसंगी
माजी भारतीय क्रिकेटपटू कर्सन घावरी (अध्यक्ष),
अनिल जोगळेकर व कृष्णा हेगडे (उपाध्यक्ष), विनायक धोतरे (सचिव),राजेश पाटील (खजिनदार) उपस्थित होते.
ही संघटना १९८८ साली पद्मश्री व माजी भारतीय कर्णधार अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली असून सध्या २८ राज्य संघ या संघटनेशी संलग्न आहेत.
या संघटनेने ऑगस्ट २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेला दिव्यांग क्रिकेट वर्ल्डकप यशस्वीरित्या आयोजित केला होता, ज्यामध्ये भारतीय संघाने विजेतेपद मिळविले. तसेच माजी मुंबई क्रिकेटपटू दीपक जाधव हे निवड समितीचे अध्यक्षआहेत.
या भेटीप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शारीरिक दिव्यांग क्रिकेटपटूंना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन या संघटनेच्या प्रतिनिधींना दिले.



















