Home Uncategorized *अक्कलकोट व माढ्याचे भांडी वाटप केंद्र सोलापुरात का?* *विष्णू कारमपुरी*

*अक्कलकोट व माढ्याचे भांडी वाटप केंद्र सोलापुरात का?* *विष्णू कारमपुरी*

75
0

*अक्कलकोट व माढ्याचे बांधकाम कामगारांसाठी भांडी वाटप केंद्र सुरू करा..*
*संघर्ष समितीचे कामगार आयुक्त यांना निवेदन.*
*सोलापूर
महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार महामंडळाच्या वतीने, बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच देण्यात येतो आणि भांडी वाटप केंद्र संबंधित तालुक्यात असणे गरजेचे असताना अक्कलकोट व माढा तालुक्याचे भांडी वाटप सोलापूर शहरात करण्यात येते ते नियमबाह्य असून, कामगारांना अडचणीचे ठरणार आहे., म्हणून अक्कलकोट व माढा तालुक्यात भांडी वाटप केंद्र सुरू करा., अशा मागणीचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त यांना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले आहे.
विष्णू कारमपुरी (महाराज) व सोहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली मा.सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासन व महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना गृह वस्तू पेटी (भांडी संच) वाटप करण्याची योजना असून, त्या योजनेद्वारे संबंधित विभागाच्या तालुक्यात नियमानुसार भांडी वाटप करणे गरजेचे आहे., परंतु अक्कलकोट विभाग व माढा तालुक्याचे भांडी वाटप सोलापूर शहरालगत होत असल्याचे दिसून येते., हे बांधकाम कामगारांना अडचणीचे होत आहे व बांधकाम कामगार योजनेच्या नियमांचा भंग होत आहे. एकीकडे नियम भंग व दुसरीकडे बांधकाम कामगारांना सहजासहजी योजनेचा लाभ मिळावा हे महामंडळाच्या उद्देशाला आडकाठी आणणारे आहे., एकूणच संबंधित ठेकेदार मनमानी करून भांडी वाटप करत असल्याचे दिसून येते.
तरी माननीयांनी अक्कलकोट व माढा तालुक्याचे बांधकाम कामगारांसाठी त्या त्या तालुक्यात भांडी वाटप केंद्र सुरू करण्याचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त व बांधकाम कामगार योजनेचे जिल्हाध्यक्ष या नात्याने द्यावे., ही नम्र विनंती, अन्यथा आमच्या महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे.
विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सोहेल शेख, वैशाली बनसोडे, गणेश बोडू, रेखा आडकी, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी यांची उपस्थिती होती.
अक्कलकोट व माढा तालुक्यात भांडी वाटप केंद्र सुरू करावे, या मागणीचे निवेदन सरकारी कामगार अधिकारी अस्मिता घाडगे मॅडम यांना देताना विष्णू कारमपुरी , सोहेल शेख, रेखा आडकी दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here