Home Uncategorized *महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC)पूर्वपरीक्षा पुढे ढकला*

*महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC)पूर्वपरीक्षा पुढे ढकला*

69
0

‘शिवसंग्राम’च्या अध्यक्ष डाॅ ज्योती मेटे यांचे मुख्यमंत्र्यांना भावनिक आवाहन

​सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे एम पी एससी च्या पुर्वपरिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची बाजू मांडणारे निवेदन शिवसंग्राम च्या अध्यक्ष डाॅ ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी मेलद्वारे पाठवले आहे.

संपूर्ण राज्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
​अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि त्यांना २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या नियोजित परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचणे शक्य होणार नाही.
​या परिस्थितीची दाहकता आणि विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता, मी आपणास विनंती करते की, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून दि २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी..​या परिस्थितीत आपण योग्य तो निर्णय घ्याल अशी आशा आहे.
असे भावनिक आवाहन या निवेदनात अध्यक्ष मेटे यांनी मुख्यमंंत्र्यांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here