Home Uncategorized *डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचे दोन टायर फुटले – अपघात टळला*

*डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचे दोन टायर फुटले – अपघात टळला*

94
0

टेंभुर्णी (सोलापूर बायपास), दि. २६ सप्टेंबर २०२५ :
महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचे दोन टायर शुक्रवारी टेंभुर्णी बायपासवर फुटले. आसपास फार वाहने नव्हती आणि
धाराशिव येथील शासकीय गाडीवरील चालकाने फार प्रसंगवधानाने गाडी बाजुला घेतली, त्यांच्या समयसूचकतेने मोठा अपघात टळला.
डॉ. गोऱ्हे या सोलापूरहून पुण्याकडे निघाल्या असताना ही घटना घडली.

*खड्ड्यांमुळे वाढलेला धोका*

टेंभुर्णीच्या बायपास मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्यामुळे प्रवासादरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली. डॉ. गोऱ्हे यांच्या गाडीनंतर प्रवास करणाऱ्या आणखी दोन वाहनांचेही टायर त्याच परिसरात फुटले. यामुळे या रस्त्यावरील गंभीर स्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

*तातडीची पावले उचलण्याचे निर्देश*

घटनेनंतर डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले. नागरिकांचे आणि प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ नयेत म्हणून त्वरित कारवाई करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

*डॉ.गोऱ्हे सुखरूप*

या प्रसंगात डॉ. नीलम गोऱ्हे पूर्णपणे सुखरूप असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृतपणे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here