Home Uncategorized पुणे ए पी एम सीमध्ये सभापती प्रकाश जगताप आणि काही संचालकांची उघडपणे...

पुणे ए पी एम सीमध्ये सभापती प्रकाश जगताप आणि काही संचालकांची उघडपणे हुकुमशाही सुरू!-

71
0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार )चे प्रवक्ता विकास लवंडे यांचा आरोप
स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल!

एपिएमसीचे सचिव राजाराम धोंड़कर म्हणतात असं काही घडलेच नाही!

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या पुणे APMC चे सभापती प्रकाश जगताप व काही संचालक मंडळाची केवळ हुकुमशाही नव्हे तर गुंडागिरी करुन प्रश्न विचारणाऱ्या
शेतकर्‍यांची मुस्कटदाबी करत असल्याची घटना समोर आली आहे.
गुरुवारी दुपारी विकास लवंडे,शेतकरी सूर्यकांत काळभोर, राजन तुपे यांचेसोबत संस्था सचिवांच्या कार्यालयात गेले होते. त्या वेळेस सचिवांच्या ऑफिसमध्ये अचानक १५/२० जण घुसले ! दादागिरी व दमबाजी करत माहिती देण्यास टाळाटाळ करु लागले, कारण आपल्या मनमानी कारभाराचे काळे कारनामे बाहेर येतील आणि आपला गैरकारभार व भ्रष्टाचार उघड होईल यासाठीच हा प्रकार घडला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार )चे प्रवक्ता विकास लवंडे यांनी केला आहे.

या भ्रष्ट सभापती व संचालकांना पुणे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुख्य आधार असून राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांचा आशीर्वाद आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस डोळेझाक करत आहेत.

ही मंडळी शेतकऱ्यांची लूट करून सत्तेच्या छत्राखाली मस्तावली आहेत. सभापती व संचालकांना पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुख्य आधार असून, पणनमंत्री जयकुमार रावळ यांचा आशीर्वाद आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व प्रकरणाकडे ठरवून डोळेझाक करत आहेत. म्हणूनच या मंडळींच्या बेकायदेशीर कारभाराला आळा बसत नाही.

धमकावून, गुंडगिरी करून आम्हाला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांचा हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी कायम संघर्ष सुरूच राहील ,असं विकास लवांडे म्हणाले.

एपिएमसीचे सचिव दौंड़कर यांना या घटनेबाबत
दूरध्वनीवरून संपर्क करुन विचारले असता ते म्हणाले की , ” माझा मी समर्थ आहे. कुणाला कशाला बोलवू?कुणी आलं ऑफिसात की आजुबाजूला कळतं. लवंंडे व सहकाऱ्यांना काही कागदपत्रे हवी होती तो संचालकांचा विषय आहे. तेव्हा कुणीही गुंड आले नाही. जे होते ते मंडळाचे सभापती, संचालक होते. त्यांच्यात बोलणं झालं.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here