*नरेंद्र मोदी यांना महिला आघाडी सिंदूर पाठविणार*
*माझा देश माझ कुंकू*
*सिंदूर के सन्मान मे शिवसेना मैदान मे*
दिनांक २२ एप्रिल रोजी काश्मीर येथील ‘पहेलगाम’ येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध मारले गेले.या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ‘पाकिस्तान बरोबरचे सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली’ व ‘पाणी व रक्त एकत्र वाहणार नाही.’ अशी डायलॉगबाजी करत ‘पाणी करार’ मोडीत काढला.’पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याची’ भाषाही केली गेली.
या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ शीर्षकाखाली पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर सैनिकी कारवाई करण्यात आली.अजूनही हे ऑपरेशन संपले नसल्याचे सांगण्यात येते.
अद्यापही या कुटुंबियांचा आक्रोश थांबलेला नाही.सगळीकडे वेदना असताना, दिनांक १४ सप्टेंबर रोजी ‘भारत-पाक सामना’ अबुधाबी येथे खेळविण्यात येत आहे.’भाजपा’ चा दांभिक चेहरा व दुटप्पीपणा यामुळे उघडकीस आला आहे.देशभक्तीचे नाटक करून एकप्रकारे हा ‘देशाशी केलेला द्रोहच’ आहे.याला तीव्र विरोध व निषेध व्हायलाच हवा.
यासाठी
भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्याला विरोध करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी विभाग क्रमांक ९ च्या वतीने *दि. १४ सप्टेंबर रोजी दु. १२ वाजता* ‘माझा देश माझे कुंकू,सिंदूर के सन्मान मे शिवसेना मैदान मे’ या शीर्षकाखाली *प्रतीक्षानगर सायन येथील *छत्रपती शिवाजी महाराज चौक, वेलनेस मेडिकलच्या बाजूला, शिवसेना शाखा क्रं.१७३ जवळ, सरदार नगर, मुंबई – २२* आंदोलन करण्यात आले.
भारत पाक सामना खेळण्यास संमती देवून शहीदांचा अपमान करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना सिंदूर पाठविण्यात येणार आहे.
यासाठी सर्व महिलानी दुपारी १२ वाजता एकत्रित जमून निषेध व्यक्त केला आहे.केवळ व्यापारासाठी सौभग्यवतींच सिंदूर विसरणाऱ्यांचा धिक्कार करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
शिवसेना विभाग क्रमांक ९च्या वतीने आयोजित पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकारविरोधात शिवसेना महिला आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन रविवारी सायन प्रतीक्षा नगर येथील शिवसेना शाखा क्रमांक १७३ च्याबाजूला छत्रपती शिवाजी महाराज चौक,वेलनेस मेडिकल जवळ येथे करण्यात आले.
सदर ठिकाणी खासदार अनिल देसाई,
विभागप्रमुख प्रमोद शिंदे,महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे,विधासभाप्रमुख गोपाळ शेलार,गजानन पाटील, प्रणिता वाघधरे,तसेच मोठ्या प्रमाणात उपस्थित महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.



















