Home Uncategorized *सर्जनशील लेखनासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या* *शरद पवार इन्स्पायर साहित्य...

*सर्जनशील लेखनासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या* *शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप* *ची घोषणा*

62
0

मुंबई
‘यशवंतराव चव्हाण सेंटर’, मुंबई तर्फे *‘शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप’*ची घोषणा करण्यात आली आहे. ‘ध्यास सर्वोत्तमचा, शोध युवा लेखकांचा’ हे या फेलोशिपचे ब्रीदवाक्य असून या उपक्रमाचा उद्देश प्रतिभावान तरुण लेखकांचा शोध घेऊन त्यांना सर्जनशील लेखनासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.

फेलोशिप अंतर्गत १२ तरुण लेखक/लेखिका यांची निवड केली जाईल, त्यांना नियोजनबद्ध मार्गदर्शन दिले जाईल तसेच तज्ज्ञ समितीने मंजूर केलेल्या लेखनाचे पुस्तकरूपात प्रकाशन करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.

यासाठी पात्रता :
• मराठी भाषिक तरुण लेखक/लेखिका.
• वयोमर्यादा : १२ ऑगस्ट २०२५ रोजी ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी.
• साहित्य प्रकार : कादंबरी/दीर्घकथा, नाटक, ललितेतर साहित्य, अनुवाद, विज्ञान साहित्य, बालसाहित्य.

कालावधी व अर्ज प्रक्रिया :
• फेलोशिप कालावधी : १४ डिसेंबर २०२५ ते १४ डिसेंबर २०२६.
• ऑनलाइन अर्ज कालावधी : १२ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर २०२५.
• निवड प्रक्रिया : २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२५.
• निवड झालेल्या उमेदवारांची घोषणा: २६ नोव्हेंबर २०२५.
• फेलोशिप प्रदान सोहळा : १४ डिसेंबर २०२५.

इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शरद पवार फेलोशिपच्या संकेतस्थळावर सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : www.sharadpawarfellowship.com
अधिक माहितीसाठी संपर्क : 9821681147
ईमेल : sahitya@sharadpawarfellowship.com
अशी माहिती ‘शरद पवार साहित्य फेलोशिप’चे समन्वयक व यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई चे ग्रंथालय संसाधन व ज्ञान विभाग व्यवस्थापक,
डॉ. अनिल पाझारे, यांनी प्रसारित केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here