Home Uncategorized *रत्नागिरीत श्री रत्नागिरीचा राजा चा विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न!*

*रत्नागिरीत श्री रत्नागिरीचा राजा चा विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न!*

109
0

*मंत्री डॉ उदय सामंत आणि मा आमदार राजन साळवी यांनी घेतला ढोल वादनाचा आनंद*

रत्नागिरी,
रत्नागिरीत ‘श्री रत्नागिरीचा राजा’ गणेशाचा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात पार पडला.
विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविक आणि तरुणांचा उत्स्फुर्त सहभाग होता!
ढोल-ताशांच्या निनादात संपुर्ण शहर भाविकांच्या एकत्रित जयघोषाने दणाणून गेले.
यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत आणि माजी आमदार राजन साळवी यांनी एकत्रीत ढोल-ताशे वाजवत पारंपारिक वाद्यांच्या गजरात सहभाग घेतला. त्यांच्या सहभागामुळे मिरवणुकीचे वैभव अधिकच खुलून आले.
श्री गणरायाला नागरिकांनी भावपूर्ण निरोप देत ‘पुढल्या वर्षी लवकर या’ असा गजर केला. शिस्तबद्ध आणि पारंपारिक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्याने रत्नागिरी शहरातील वातावरण मंत्रमुग्ध झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here