Home Uncategorized *केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या गणरायाचे दर्शन*

*केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या गणरायाचे दर्शन*

57
0

मुंबई, दि. ३० – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या लालबागच्या गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. रवींद्र चव्हाण, अमित साटम, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी यावेळी अमित शाह यांच्या समवेत उपस्थित होते.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here