Home Uncategorized *ज्ञानमंदिरातील विद्यार्थ्यांची लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधानभवनाची*

*ज्ञानमंदिरातील विद्यार्थ्यांची लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधानभवनाची*

71
0

*विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घडवली भेट*
मुंबई/संभाजी नगर – गेले ३ वर्षे विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदाची धुरा यशस्वीपणे हाताळल्यावर आज या पदाच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ज्ञानमंदिरातील विद्यार्थ्यांची लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधानभवनाची भेट घडवून आणून विद्यार्थ्यांसोबत घालविला.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भिसेवाडी केंद्र लासुर येथील ‘भिसेवाडी जिल्हा परिषद शाळे’ च्या २ री ते ५ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई येथील विधानभवनात अभ्यासदौरा भेट आयोजित केली.
या अभ्यासदौऱ्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व विधान भवन तसेच सभापती यांचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी विधानभवनातील कामकाज कसे चालते याबाबत माहिती दिली. विधानसभा व विधान परिषद व मध्यवर्ती सभागृह या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले, तसेच तेथील कामकाजाची प्राथमिक माहिती समजून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांची जिज्ञासा पाहायला मिळाली.
या भेटीत विद्यार्थ्यांना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनाही भेटण्याचा योग आला. सभापती यांना विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्याला तितक्याच आनंदाने प्रा. राम शिंदे यांनीही उत्तरं दिली. सभापती व विद्यार्थी यांच्यातील संवाद हा विद्यार्थ्यांना समृद्ध करणारा ठरला.
जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम होत असल्याने शहरात येऊन हे विद्यार्थी आत्मविश्वासाने बोलत वावरत होते याचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी कौतुक केले.
“विरोधी पक्षनेते अंबादास दानवे लवकरच विधानभवनात परत दिसतील.” अशा शुभेच्छा देत सभापती यांनी दानवे यांचा सत्कार केला.
तसेच भिसेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेख फिरोज व विद्यार्थ्यांनी सभापती राम शिंदे व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आभार मानले.

भिसेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक फेरोज शेख, सहशिक्षक विजय मित्तेवाड ,अर्जुन जाधव,गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर,केंद्रप्रमुख पी जी पवार,संतोष जाधव,संतोष आढाव व पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here