*समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात*
मुंबई
समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून येत्या गणेशोत्सवात विद्येची देवता गणरायाचरणी हार, फुले, मोदकांसह वह्या पेन, पेन्सिल व शैक्षणिक साहित्य अर्पण करून समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावे असे आवाहन ‘एक वही एक पेन अभियान’ व ‘सुमनालय फाउंडेशन’ च्या वतीने राज्यातील गणेशभक्त व गणेश मंडळांना करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात १० दिवस गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.
सजावट ,सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. राज्यातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व व पक्ष संघटनांकडून स्तुत्य असे उपक्रमही राबविले जातात.
याचाच एक भाग म्हणून गणेशभक्तांनी दर्शनाला येताना हार फुले, मोदक, नारळ या पुजा व प्रसादाच्या वस्तुसह आपापल्या परीने वह्या, पेन पेन्सिल स्कूल बॅग वापरात नसलेले जुने मोबाईल, टॅब पुस्तके, आदी शैक्षणिक साहित्य गणरायाचरणी अर्पण करावेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील आपल्या मंडळाच्यावतीने गणेशभक्तांना तसे आवाहन करावे , असे आवाहन ‘एक वही एक पेन अभियान’ आणि ‘सुमनालय फाउंडेशन’
च्या वतीने करण्यात आले आहे.
* सदर उपक्रमात सहभाग देण्यासाठी ९३७२३४३१०८/
९६१९५३५४०५
या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन या अभियानाचे जनक राजू झनके आणि या मोहिमेला साथ देणार्या सुमनालय फाऊंडेशन च्या डॉ सुजाता वॉरियर यांनी केले आहे.


















